Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WorldNewsUpdate : बेपत्ता घोटाळेबाज मेहुल चोक्सी सापडला

Advertisements
Advertisements
Spread the love

नवी दिल्ली : पीएनबी घोटाळ्यातील आरोपी असलेला आणि भारतातून पसार झालेला मेहुल चोक्सी  हा तीन दिवसांपूर्वी मध्य अमेरिकेतील अँटिग्वामधून बेपत्ता झाल्याचे  वृत्त समोर आले  होते . पण आता मेहुल चोक्सी  याचा ठावठिकाणा लागल्याची माहिती समोर आली आहे. अँटिग्वामधून बेपत्ता झालेला मेहुल चोक्सी हा शेजारील डोमिनिका  देशात सापडला असून त्याला डोमिनिकाच्या गुन्हे अन्वेषण विभागाने  ताब्यात घेतले असल्याचे  वृत्त स्था आहे.

Advertisements

दरम्यान मेहुल चोक्सी हा पीएनबी घोटाळ्यातील आरोपी आहे आणि त्याच्या विरुद्ध इंटरपोलनेही रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे. तीन दिवसांपूर्वी तो अँटिग्वामधून गायब झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. अँटिग्वामधून क्युबा येथे पसार झाल्याचं वृत्तही समोर आलं होतं. मात्र, आता डोमिनिकाच्या सीआयडीने त्याला ताब्यात घेतले आहे. मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांच्यावर पंजाब नॅशनल बँकेसोबत 13 हजार कोटींहून अधिकचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. हा घोटाळा केल्यानंतर दोघांनीही परदेशात पळ काढला आहे. पीएनबी घोटाळा प्रकरणी मेहुल चोक्सी याच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांना भारतात आणण्यासाठी भारतीय तपास यंत्रणांचे प्रयत्न सुरू आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी याची आतापर्यंत 14 कोटींहून अधिकची संपत्ती जप्त केली आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!