Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraNewsUpdate : राज्यातील रुग्ण बरे होण्याचे  प्रमाण हे ९१.०६ टक्के , ५९४ जणांचा मृत्यू

Spread the love

मुंबई : राज्यात गेल्या  २४ तासात ५१ हजार ४५७ रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्यामुळे  राज्यातील रुग्ण बरे होण्याचे  प्रमाण हे ९१.०६ टक्के झाले आहे. तर एका दिवसात ३४ हजार ३१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर  राज्यात कोरोनामुळे एका दिवसात ५९४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा १.५४ टक्के इतका आहे. राज्यात ३० लाख ५९ हजार ९५ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. तर २३ हजार ८२८ रुग्ण संस्थात्मक विलगीकरण कक्षात आहेत. आजपर्यंत राज्यात ३ कोटी १८ लाख ७४ हजार ३६४ जणांच्या  कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५४ लाख ६७ हजार ५३७ जणांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. सध्या राज्यात ४ लाख १ हजार ६९५ सक्रीय करोना रुग्ण आहेत.

जिल्हा निहाय सक्रिय रुग्ण

मुंबई- २९,४४५
ठाणे- २८,३८३
पुणे-६७,२९५
नाशिक- १८,४३२
औरंगाबाद- ७,३३७
नागपूर- २३,२७२

पुण्यात एकाच दिवसात १ हजार १६४ रुग्ण नव्याने आढळले, तर ४८ रुग्णांचा मृत्यू

पुणे शहरात दिवसभरात १ हजार १६४ करोना बाधित रुग्ण आढळले. तर आज अखेर ४ लाख ६२ हजार १७२ इतकी संख्या झाली आहे. तर याच दरम्यान ४८ रुग्णांचा मृत्यू झाला असून ७ हजार ८४३ मृतांची संख्या झाली. त्याच दरम्यान २ हजार ४०७ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर ४ लाख ३९ हजार ९७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

दरम्यान मुंबईत गेल्या २४ तासात १३५० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४,५६५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांन घऱी सोडण्यात आले  आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे  प्रमाण ९३ टक्के आहे. सध्या मुंबईत २९,६४३ सक्रीय रुग्ण आहेत. रुग्ण दुप्पटीचा दर २६९ दिवसांवर पोहोचला आहे. १२ मे ते १८ मे दरम्यात रुग्णवाढीचा दर हा ०.२५ टक्के इतका होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!