Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : दिल्लीतील लॉकडाऊनची मुदत  एका आठवड्यासाठी वाढवली 

Spread the love

नवी दिल्ली : कोरोनामुळे राजधानी दिल्लीतील स्थिती गंभीर होत चालल्याने  पुन्हा एकदा दिल्लीतील लॉकडाऊनची मुदत  एका आठवड्यासाठी वाढवली  आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही माहिती दिली आहे. १७ मे पर्यंत हा लॉकडाऊन असणार असून निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत.

कोरोनाचा वाढता संसर्ग थांबवण्यासाठी  गेल्या १९ एप्रिलपासून दिल्लीत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तीन वेळा हा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला. उद्या १० मे रोजी हा लॉकडाऊन संपणार होता. मात्र करोना स्थिती पाहता हा लॉकडाऊन आणखी आठवडाभर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आठवडाभराच्या लॉकडाऊनमध्ये मेट्रो सेवाही बंद करण्यात आली आहे. मागच्या काही दिवसात रुग्णांच्या संख्येत २३ ते ३५ टक्क्यांनी घट झाल्याचे  त्यांनी सांगितले . तसेच नागरिकांनी सहकार्य करावे  असे  आवाहनही त्यांनी केले आहे.

दरम्यान शनिवारी  दिल्लीत १७ हजार ३६४ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. करोनामुळे ३३२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा १९ हजारांच्या पार गेला आहे. सध्या दिल्लीत ८७ हजार ९०७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर देशात एका दिवसात ४ लाख ३ हजार ७३८ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. काहीसा दिलासादायक बाब म्हणजे याच कालावधीत देशभरात ३ लाख ८६ हजार ४४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. तर देशात सलग चौथ्या दिवशी चार हजारांहून अधिक मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या २४ देशात ४ हजार ९२ करोना रुग्णांना प्राण गमवावे लागले. त्यामुळे देशातील एकूण मृतांची संख्या आता २ लाख ४२ हजार ३६२ वर जाऊन पोहोचली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!