Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCrimeUpdate : मानवतेची ऐशी तैसी !! रेमडेसीवीर म्हणून पाणी टाकून विकत होते इंजेक्शन !! तिघांना अटक

Spread the love

बुलडाणा : देशातील प्रत्येक व्यक्ती कोरोनावर मात करण्यासाठी धडपडत असून  अशा परिस्थिचा गैरफायदा घेत  पैशाच्या हव्यासापोटी काही जण काळाबाजार करत आहे. बारामतीसह अनेक शहरात पोलिसांनी लोकांची लुबाडणूक आणि फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई केली खरी परंतु अनेक भामटे सुधारण्यास तयार नाहीत. बुलडाण्यात तर चक्क रेमडेसीवीर इंजेक्शनच्या रिकाम्या कुप्यात पाणी भरून काळाबाजार केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुलडाणा जिल्ह्यात रेमडेसीवीर इंजेक्शन्सचा काळाबाजार होत असल्याबाबत अनेक तक्रारी होत्या. त्या अनुषंगाने बुलडाणा गुन्हे शाखेच्या वतीने  शहरात या इंजेक्शन्सची काळाबाजारी करणाऱ्या 3 जणांना अटक करण्यात आली होती. हे तिघे जण बुलडाणा शहरातील नामांकित डॉ. मेहेत्रे व डॉ लद्दड यांच्या हॉस्पिटलचे वॉर्ड बॉय आहेत.

विशेष म्हणजे रेमडेसीवीर इंजेक्शन्सचा काळाबाजार करत असताना पकडण्यात आलेल्या तीन जणांकडून रेमडेसीवीर इंजेक्शन्सच्या रिकाम्या कुप्यात पाणी भरून रुग्णांच्या नातेवाईकांना विकले जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. 15 ते 20 हजार रुपयांमध्ये रेमडेसीवीर इंजेक्शनची विक्री केली जात होती. या हॉस्पिटलमध्ये वापरल्या गेलेले रेमडेसीवीर इंजेक्शन्सच्या रिकाम्या कुप्यात पाणी भरून रुग्णांच्या नातेवाईकांना विकत असल्याची आरोपींनी कबुली दिली आहे. त्यामुळे या पाण्याने भरलेल्या रेमडेसीवीरच्या कुप्या किती जणांना विकल्या व त्याचा किती रुग्णांवर वापर करण्यात आला आहे, हे ही तपासावं लागणार आहे. ह्या संपूर्ण किळसवाण्या प्रकारामुळे कोरोना काळात माणुसकी ओशाळली असल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केल्या जात आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!