Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : कोरोनाशी संबंधित लस , औषधी आणि उपकरणावरील सीमा शुल्क सरकारने केले माफ

Spread the love

नवी दिल्ली : कोरोना लसीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या लसींवर, मेडिकल ऑक्सिजन आणि संबंधित उपकरणांवर सीमा शुल्क माफ करण्यात आल्याची घोषणा केंद्राकडून करण्यात आली असून  करोना लसींवर लागणाऱ्या सीमा शुल्कातही कपात करण्यात आली असल्याचे वृत्त आहे. दरम्यान देशात ऑक्सिजन तुटवड्याचे  संकट जाणवत असताना १ मे पासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीकरण मोहिमेत सहभागी होता येणार आहे. याआधी केंद्राने  सीमा शुल्क माफ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

परदेशातून येणाऱ्या लसींवर सध्या सरकारकडून १० टक्के सीमा शुल्क किंवा आयात शुल्क आणि १६.५ टक्के आय-जीएसटी तसेच सामाजिक कल्याण सेस लावला जातो. या करांच्या ओझ्यामुळे आयात करण्यात आलेल्या लसींची किंमत सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाच्या ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ लसींहून कित्येक पटीने  वाढते. परंतु, सरकारने  घेतलेल्या या निर्णयामुळे लसींच्या किंमतीवर नियंत्रण राहण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान देशातील ऑक्सिजन तुटवड्यामुळे देश मोठ्या कठिण प्रसंगातून वाटचाल करत आहे. केंद्र आणि राज्य सरकार ऑक्सिजनसाठी धडपड करत असताना अनेक रुग्णालयांत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांनी प्राण सोडल्याच्या घटना घडत आहेत. खास ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ रेल्वे ठिकठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी वापरल्या जात आहेत. अशा वेळी ऑक्सिजनसंबंधित कोणत्याही उपकरणावर सीमा शुल्क हटवत ती थेट गरजवंतांपर्यंत पोहचवण्याचा मार्ग सरकारने  मोकळा केला आहे. तसेच लसीकरण मोहिमेत देशातील जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी राज्य, खासगी रुग्णालय आणि औद्योगिक संस्थांनाही थेट लस विक्रेत्यांकडून लस खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली असून महाराष्ट्र राज्य सरकारने यासाठी ग्लोबल टेंडर दिले आहे .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!