Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : बोगस जाॅईनिंग लेटर देऊन विद्यार्थिनीला १ लाख ९२ हजारांचा गंडा

Spread the love

औरंगाबाद – रिलायन्स जिओ कंपनीचे बोगस जाॅईनिंग लेटर देत भामट्यांनी विद्यार्थिनीला १ लाख ९२हजारांना गंडा घातल्या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

शिवकन्या संजीवन ठोंबरे (२१) असे फसवले गेलेल्या तरुणीचे नाव आहे. २७मार्च रोजी भामट्यांनी स्थानिक वृत्तपत्रात घरबसल्या पार्ट टाईम जाॅब अशा आशयाची जाहिरात दिली होती. शिवकन्या ने जाहिरातीमधे दिलेल्या टेलिफोन नंबरवर संपर्क साधल्यानंतर भामट्यांनी ठोंबरे यांना रिलायन्स जिओ कंपनीचे बोगस जाॅईनिंग लेटर देत विविध वेळैस वेगवेगळी कारणे दाखवत १लाख ९२ हजाराला फसवले. या प्रकरणी फिर्यादीने सायबर पोलिस ठाण्यात अर्ज दिला होता. त्यानंतर मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला पुढील तपास पोलिस निरीक्षक शरद इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुकुंदवाडी पोलिस करंत आहेत.

वधूपित्याला नवरदेवाकडून ४ लाखांचा गंडा,गुन्हा दाखल

औरंगाबाद – अंबिकानगरातील दांपत्याला नवरदेवाने त्यांच्या मुलीशी लग्न करण्याचे वचन देत ४लाख रु. ना गंडा घातला. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

अनिल छगण राठोड,छगन भिमा राठोड, सुनील आणि रमेश राठोड व अनिल राठोड ची आई यांचा आरोपींमधे समावेश आहे. वरील आरोपींनी कविता छगण चव्हाण (२१) हिच्या सोबंत मार्च २१ मधे लग्न ठरल्यानंतर आरोपींनी छगन चव्हाण यांच्या कडून २लाख रु. रोख आणि दोन लाख रु.खर्च करण्यास भाग पाडले व ऐन लग्नाच्या वेळी २२एप्रिल रोजी नकार देत लग्न मोडले. म्हणून कविता चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन वरील गुन्हा दाखल झाला. पीढील तपास पोलिस निरीक्षक शरद इंगळे यांच्षा मार्गदर्शनाखाली मुकुंदवाडी पोलिस करंत आहेत

आपलं सरकार

Click to listen highlighted text!