Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे निधन

Spread the love

मुंबई : काँग्रेसचे  माजी मुंबईचे शहरध्यक्ष आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड  यांचे  कोरोनाची  लागण झाल्यामुळे निधन झाले  आहे.  हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड  यांचे ते वडील होते. एकनाथ गायकवाड यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे उपचारासाठी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान आज सकाळी 10 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

एकनाथ गायकवाड यांनी मुंबईतील धारावी भागात काँग्रेस पक्षासाठी मोठे काम केले होते. त्यांनी मुंबई शहर अध्यक्षपदही भूषवले होते. लोकसभा निवडणुकीत एकनाथ गायकवाड यांनी शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांचा पराभव केला होता. दोन वेळा ते खासदार म्हणून निवडून आले होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून सेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतरही ते काँग्रेसमध्ये सक्रीय होते. जुलै 2019 मध्ये मुंबई काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती एकनाथ गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या कन्या वर्षा गायकवाड यांची महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपदावर वर्णी लागली. वर्षा गायकवाड यांच्याकडे शालेय शिक्षण खाते आहे. एकनाथ गायकवाड यांच्या निधनामुळे काँग्रेसवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दुख व्यक्त केले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!