Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : गेल्या २४ तासात ६७ हजार १२३ नवे रुग्ण , ४१९ रूग्णांचा मृत्यू

Spread the love

मुंबई : राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग थांबविण्यासाठी शासनाच्या उपाययोजना चालू असल्या तरी रूग्ण संख्या आटोक्यात येत नाही. गेल्या २४ तासात ६७ हजार १२३ करोनाबाधित वाढले असून, ४१९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यू दर १.५९ टक्के एवढा आहे. राज्यात आजपर्यंत ५९ हजार ९७० रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान राज्यात सध्या एकूण ६,४७,९३३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

याशिवाय दिवसभरात बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ५६ हजार ७८३ असून राज्यात आजपर्यंत एकूण ३०,६१,१७४ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८१.१८ टक्के एवढे झाले आहे.दरम्यान आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,३५,८०,९१३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३७,७०,७०७ (१५.९९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३५,७२,५८४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २५,६२३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६,४७,९३३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

पुण्यात दिवसभरात ६ हजार ६ रुग्ण नव्याने आढळले, ५४ रूग्णांचा मृत्यू

पुणे शहरात दिवसभरात ६ हजार ६ करोनाबाधित रुग्ण वाढले असून, ५४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर एकूण बाधितांची संख्या ३ लाख ६० हजार ८०३ झाली आहे. तर आजपर्यंत ६ हजार ५६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आज ५ हजार ६०९ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजअखेर २ लाख ९९ हजार ७८० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!