PuneNewsUpdate : पुणे हादरले !! एकाच दिवशी ११ हजारापर्यंत रुग्ण

पुणे : गेल्या काही आठवड्यांपासून पुन्हा एकदा परिस्थिती गंभीर झाली असून शनिवारी तर कोरोना रुग्णसंख्येने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. पुणे जिल्ह्यात 3 एप्रिल रोजी तब्बल 10 हजाराहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. शनिवारी दिवसवभरात पुणे जिल्ह्यात तब्बल 10 हजार 827 नवे रूग्ण आढळून आले आहेत. तर फक्त पुणे शहरात 5 हजार 720 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली.
पिंपरी चिंचवडमध्ये 2832 तर ग्रामीण भागात पहिल्यांदाच दीड हजारांवर रूग्णसंख्या झाली आहे. शनिवारी 66 कोरोना रुग्णांनी आपले प्रमाण गमावले आहेत. त्यामुळे पुण्यात कोरोनाचा समुह संसर्ग तर झाला नाही ना? अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान पुण्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी संध्याकाळी सहा वाजल्यापासून कोरोना मिनी लॉकडाऊन अर्थात 12 तासांची संचारबंदी लागू झाली आहे. संचारबंदी लागू होताच पुणे पोलिसांनी प्रमुख चौकातून नाकेबंदी करण्यात येत आहे.