Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : सावधान !! एप्रिलच्या मध्यापर्यंत कोरोनाचा स्फोट धक्कादायक स्थितीत

Spread the love

नवी दिल्ली : कोरोना प्रसाराचा हा वेग पाहाता बंगळुरूमधील  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने  (IISC) व्यक्त केलेल्या अंदाजानुसार मे महिन्याच्या अखेरपर्यंत हा आकडा 1.4 कोटीच्याही पुढे जाईल तर कोरोनाच्या ट्रेंडवर नजर ठेवणाऱ्या संशोधकांच्या  म्हणण्यानुसार, एप्रिलच्या मध्यापर्यंत कोरोना अत्यंत धक्कादायक स्थितीत येऊ  शकतो आणि अॅक्टिव्ह केस 7.3 लाखापर्यंत जाऊ शकतात.

या  संशोधकांच्या म्हणण्यानुसार, एप्रिल ते मे महिन्याच्या दरम्यान कोरोनाचा प्रसार अधिक वेगाने  होईल. मेअखेरपर्यंत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 20 लाखाहून अधिक होईल. शोधकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, जर आतापासून लोकांनी कोरोना नियमांचे  पालन केले , मास्क लावले  सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले  आणि लसीकऱणाची संख्या वाढवल्यास कोरोनाची वाढती संख्या आटोक्यात आणणे शक्य होईल. IISC चे प्रोफेसर शशिकुमार यांनी सांगितलं, की आतापर्यंत आम्ही जो अंदाज लावला आहे, तो कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या ट्रेंडवर आधारित आहे. आमच्या अंदाजानुसार एप्रिल अखेरपर्यंतच रुग्णांची संख्या 10.7 लाखापर्यंत पोहोचेल.

दरम्यान देशात कोरोनाची दुसरी लाट अत्यंत वेगाने  पसरताना दिसत आहे. कोरोनाच्या भयावह स्थितीचा अंदाज याच गोष्टीवरुन लावला जाऊ शकतो की देशात  एका दिवसात 90 हजारहून अधिक रूग्ण समोर येत आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशभरात शनिवारी कोरोनाचे 92,943 नवे रूग्ण समोर आले आहेत.

नागपूरमध्येही कोरोनाचा उद्रेक झाल्याचे पाहण्यास मिळत असून गेल्या 2 4 तासांत 47 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आल्याने दर तासाला 2 रुग्णांचा मृत्यू होताना दिसत आहे.  तर 3720 नवीन रुग्णांची भर पडली आहे. नागपूरमध्ये आज 3720 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहे. सध्याच्या परिस्थिती नागपूरमधील ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या 40 हजाराच्यावर गेली आहे. तर 47 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागपूरमध्ये जिल्हा प्रशासनाने आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

मुंबईत 9 हजारापेक्षा अधिक रूग्ण 

मुंबई शहरात कोरोनाचे 9,108 नवे रुग्ण समोर आले आहेत. याआधी 17 सप्टेंबर 2020 ला महाराष्ट्रात एका दिवसात सर्वाधिक 24,619 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. आरोग्य विभागानं म्हटलं, की 1,84,404 आणखी रुग्ण समोर आल्यानंतर महाराष्ट्रातील आतापर्यंतच्या कोरोना रुग्णांची संख्या 2,03,43,123 झाली आहे. विभागाच्या म्हणण्यानुसार, राज्याच्या रिकव्हरी रेट 84.49 टक्के असून मृत्यूदर 1.88 टक्के आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!