MumbaiNewsUpdate : रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची पंतप्रधानांकडून विचारपूस

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करून रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. त्याचसोबत त्यांना चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. सध्या रश्मी ठाकरेंवर रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर मोदींनी हि विचारपूस केली आहे.
दरम्याना काही दिवसांपूर्वी रश्मी ठाकरेंना मुंबईतील रुटीन चेक अपसाठी रिलाएन्स एच एन रुग्णालयात आणण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र काही दिवसांपासून त्यांना खोकल्याचा त्रास होत असल्यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. मुफी यांच्या देखरेखीत रश्मी ठाकरेंवर उपचार सुरु आहे.
रश्मी ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत 11 मार्चला कोवॅक्सिन लस घेतली होती. अशातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा कोरोना अहवाल देखील पॉझिटिव्ह आला होता.