Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : एप्रिल महिन्यात पूर्ण लसीकरणाचा संकल्प , सर्व सुट्या होणार रद्द

Spread the love

नवी दिल्ली :  सरकारने एप्रिल महिन्यात वेगाने  लसीकरण करण्याचा संकल्प केला असून  एप्रिल महिन्याच्या सर्व दिवशी कोरोना लसीकरण  करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खासकरुन सरकारी सुट्ट्यांच्या दिवशीही लसीकरण केले जाणार आहे. हा आदेश सरकारी आणि खासगी दोन्ही लसीकरण केंद्रांसाठी लागू असणार आहे. दरम्यान देशात बुधवारी सकाळी सात वाजता आलेल्या अहवालानुसार आतापर्यंत 6.30 कोटीहून अधिक जणांचे  लसीकरण करण्यात आले आहे. त्यापैकी 82 लाख 16 हजार 239 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर 52 हजार 19 हजार 525 जणांना कोरोनाचा दूसरा डोस देण्यात आला आहे.

कोविड योद्धे असलेल्या 90 लाख 48 हजार 417 जणांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला असून 37 लाख 90 हाजर 467 जणांना कोरोनाचा दूसरा डोस देण्यात आला आहे. 45 वर्षाहून अधिक वय असलेल्या 73 लाख 52 हजार 957 जणांना कोरोनाचा पहिला डोस देण्यात आला असून 6 हजार 824 जणांना कोरोनाचा दूसरा डोस देण्यात आला आहे. तर 60 पेक्षा अधिक वय असलेल्या 2 कोटी 93 लाख 71 हजार 422 जणांना कोरोना लसीचा पहिला डोस दिला असून 48 हजार 502 जणांना कोरोना लसीचा दूसरा डोस देण्यात आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!