Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : कोण म्हणतो कोरोना काळात धंदा नाही , जीएसटीचे हे कलेक्शन पहा….

Spread the love

नवी दिल्ली : कोरोना आणि लॉकडाऊच्या काळात अर्थव्यवस्था मोडकळीस आल्याचे चित्र असतानाही कोरोनाच्या प्रकोपानंतर सलग सहाव्यांदा जीएसटी 1 लाख कोटीच्या पार मिळाले असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे विशेष म्हणजे  मार्च महिन्यातील जीएसटी कलेक्शनने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. 1 लाख 23 हजार 902 कोटींचा जीएसटी वसूल करण्यात आला आहे. याबाबत देशात जीएसटी लागू झाल्यापासून आतापर्यंतचा सर्वाधिक जीएसटी मिळाला असल्याचे ट्वीट अर्थमंत्रालयाने केले आहे.

अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या एकूण जीएसटीत केंद्रीचा जीएसटी 22,973 कोटी, राज्याचा जीएसटी 29,329 कोटी आणि एकीकृत जीएसटी 62,842 कोटी रुपये आहे. त्याचबरोबर उपकर 8 हजार 757 कोटी इतका आहे. यात 935 कोटी रुपये वस्तु आयातीवर मिळालेल्या कराचे आहेत.

कोरोना प्रकोपानंतर गेल्या 6 महिन्यांचे  जीएसटी कलेक्शन

मार्च 2021              1,23,902

फेब्रुवारी 2021          1,13,143

जानेवारी 2021          1,19,847

डिसेंबर 2020           1,15,174

नोव्हेंबर 2020           1,04,963

ऑक्टोबर 2020         1,05,155

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!