Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoroanaAurangabadUpdate : औरंगाबादची स्थिती गंभीर , ३४ मृत्यू तर १४८१ नवे रुग्ण !! 

Spread the love

औरंगाबाद ।  औरंगाबाद जिल्ह्यात अंशतः लॉकडाऊन करूनही  नव्या रुग्णांची संख्या तर वाढत आहेच शिवाय चिंताजनकमध्ये कोरोनामुळे गेल्या 24 तासात 34 रुग्ण दगावल्याचे धक्कादायक वृत्त आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार नवीन  1481 रुग्णांची नोंद झाली असून उपचारानंतर 1321 जणांना सुटी देण्यात आली. दरम्यान आजपर्यंत 66759 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आजपर्यंत  जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 84160 झाली आहे.


गेल्या 24तासातील 34 रुग्णांसह आजपर्यंत एकूण 1704 जणांचा मृत्यू झाला असून सक्रिय रुग्णांची संख्या  15697 आहे. नव्याने आढळलेल्या 1481 रुग्णामध्ये महापालिकेतील 922रुग्णांचा तर ग्रामीण भागातील 559 रुग्णांचा समावेश आहे. रात्रंदिवस काळजी घेऊनही ना रुग्ण संख्या कमी होत आहे ना मृत रुग्णांची संख्या कमी होत आहे त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्यासह जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता , महापालिका आयुक्त अस्तितकुमार पांडे असे सर्व अधिकारी , कर्मचारी आणि आरोग्य यंत्रणा रस्त्यावर आहे . तरीही कोरोनाच्या  संसर्गाची साखळी तुटायला तयार नाही.

लॉकडाऊन राजकारण आणि दबाव

औरंगाबाद शहराचे जिल्हाधिकारी , महापालिका प्रशासक तथा आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांनी सहविचाराने जिल्ह्यात १० दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता परंतु राजकीय लोकप्रतिनिधी आणि व्यापाऱ्यांच्या दबावामुळे प्रश्नाला एक पाऊल मागे यावे लागले. विशेष म्हणजे हे सर्व अधिकारी कोरोनाविषयक नियमांच्या अंमलबजावणीत एकटे पडत आहेत. लोक प्रतिनिधी मात्र लॉक डाऊन ला विरोध करून राजकारण करीत असल्याची भावना अधिकाऱ्यांमध्ये झाली आहे.

असे आहेत 34 मृत्यू 

आज झालेल्या 34 मृत्यू मध्ये  घाटीतील 1. पुरूष/41/तीसगाव, औरंगाबाद. 2. स्त्री/60/हर्सूल, औरंगाबाद. 3. स्त्री/68/भडकल गेट, औरंगाबाद. 4. स्त्री/55/राहुल नगर, रेल्वेस्टेशन, औरंगाबाद. 5. पुरूष/51/कन्नड, जि.औरंगाबाद. 6. पुरूष/42/कैसर कॉलनी, औरंगाबाद. 7. पुरूष/77/चिंचखेडा, जि.औरंगाबाद. 8. स्त्री/75/अजिंठा, जि.औरंगाबाद 9. पुरूष/90/बीड बायपास, औरंगाबाद. 10. स्त्री/75/ हाराह नगर, औरंगाबाद.11. स्त्री/66/लासूर स्टेशन, जि.औरंगाबाद. 12. पुरूष/59/जुना बाजार, औरंगाबाद. 13. स्त्री/3/घाटनांद्रा, ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद. 14. पुरूष/70/गंगापूर, जि.औरंगाबाद. 15. पुरूष/60/पडेगाव, औरंगाबाद. 16. स्त्री/65/औरंगाबाद. 17. स्त्री/62/खुल्ताबाद, जि.औरंगाबाद. 18. पुरूष/56/एन-4 सिडको,  औरंगाबाद. जिल्हा सामान्य रुग्णालयातील  07 मृत्यूंमध्ये 1. स्त्री / 40/ जाधववाडी 2. पुरूष/ 78/ हडको 3. पुरूष/ 80/ गारखेडा परिसर 4. स्त्री /60 /गुरूदत्त नगर 5. स्त्री / 75/ एन चार सिडको 6. पुरूष/ कोडापूर, ता. गंगापूर 7. 80/ पुरूष/ आदर्श कॉलनी, कन्नड तर खासगी रुग्णालयातील  09 मृत्यूंमध्ये 1. पुरूष/ 77 / इटखेडा, औरंगाबाद 2. स्त्री / 77 / एकता कॉलनी, औरंगाबाद 3. स्त्री / 63/ जवाहर कॉलनी, औरंगाबाद 4. पुरूष /56/एमआयडीसी चिकलठाणा 5. स्त्री / 65/एन नऊ सिडको, औरंगाबाद 6. पुरूष / 66/ देवानगरी, औरंगाबाद 7. पुरूष/ 89/ चैतन्य नगर, औरंगाबाद 8. पुरूष/ 85 / उल्कानगरी , औरंगाबाद 9. स्त्री / 67/ देऊळगाव बाजार,सिल्लोड

आपलं सरकार

Click to listen highlighted text!