AurangabadCrimeUpdate : जाणून घ्या कारण : औरंगाबादेत मध्यरात्रीचा थरार : “ते” आले , त्यांनी फायर केले आणि “ते” पसार झाले !!

लग्न करु नये म्हणून हाॅटेल मालकाच्या मुलावर गोळीबार
हाॅटेल मनीष इनच्या मालकाच्या मुलावर आरोपीला आवडत असलेल्या मुलीशी लग्न करु नये म्हणून घराबाहेरुन काचेवर गोळीबार केला.या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होत आहे. या प्रकरणात आरोपी निष्पन्न झाला असून त्याचे नाव विशाल गाडीलकर(३२) धंदा इंजिनिअर असे आहे. तर फिर्यादी मनीष गायकवाड (२३) रा पडेगाव परिसर मानसोपचार तज्ज्ञ डाॅ.कादरी यांच्या रुग्णालयाजवळ असे आहे. पोलिसांचे पथक आरोपीला शोधण्यासाठी रवाना झाले आहे.
औरंगाबाद : काल रात्री औरंगाबादमधील एका हॉटेलवर अज्ञात हल्लेखोराने गोळीबार केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण तयार झालं आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस अज्ञात हल्लेखोराचा शोध घेत आहेत. ही घटना मंगळवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास पडेगाव भागात घडली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी हॉटेलच्या दिशेने गोळीबार केला आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. आरोपीने हेल्मेट परिधान केल्याने त्याचा चेहरा व्यवस्थित दिसत नाही, मात्र हॉटेल चालकाने दिलेल्या माहितीनुसार घटनेचा उलगडा झाला आहे.
औरंगाबादमधील पेडेगाव भागात हॉटेल मनीष इन हे हॉटेल आहे. मंगळवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास दोन अज्ञात हल्लेखोर दुचाकीवरून आले. त्यानंतर त्यांनी हॉटेलवर गोळीबार केला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. रात्री या घटनेची परिसरात चर्चा झाली मात्र आज सकाळी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यामध्ये गोळीबार करणारी व्यक्ती स्पष्टपणे दिसत आहे. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.