NandedNewsUpdate : नांदेड पोलिसांवर हल्ला करणारे १२ संशयित पोलिसांच्या ताब्यात

नांदेड : नांदेड शहरात सोमवारी हल्ला मोहल्ला कार्यक्रमाच्या दरम्यान घडलेल्या हिंसेनंतर रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. आता या प्रकरणी वाजीराबाद पोलिसांनी 12 जणांना ताब्यात घेतले असून जवळपास 400 अज्ञात लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे वृत्त आहे. या हिंसाचारात १० पोलीस कर्मचारी गंभीर तर ४ जण अत्यवस्थ आहेत.
कोरोनाच्या कारणावरून पोलिसांनी हल्ला मोहल्ला कार्यक्रमाला परवानगी न दिल्यामुळे संतप्त जमावाने पोलीस अधीक्षकांच्या वाहनासह सात वाहनांची दंगेखोरांनी नासधूस केली आहे. पोलीस अधीक्षक यांचे दोन गार्ड या दंगलीत जखमी झालेत. तर त्या ठिकाणी सदर घटनेचे चित्रीकरण करत असणाऱ्या व्यक्तीचे तीस ते चाळीस मोबाईलही फोडण्यात आलेत. तसेच पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तासह गुरुद्वारा परिसरात लावण्यात आलेले सर्व बॅरिगेट्स तोडण्यात आले. पोलीस या प्रकरणातील दंगेखोरांना शोधून ताब्यात घेत आहेत.