Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : राज्यात कोरोनाची  २७ हजार रुग्णांची रेकॉर्डब्रेक नोंद 

Spread the love

मुंबई ।  राज्यात कोरोनाने थैमान घालायला सुरुवात केली आहे. कालपेक्षा आज राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. शुक्रवारी  कोरोना रुग्णसंख्येने 25 हजारांचा टप्पा पार केला होता. त्यात गेल्या 24 तासात राज्यातील कोरोना रुग्णसंख्येने 27 हजारांचा टप्पा पार केला आहे. ही आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. 24 तासांतील आतापर्यंतची ही सर्वाधिक आकडेवारी असल्याचे  सांगितले  जात आहे. आज राज्यातून 13, 588 रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर राज्यात आजपर्यंत एकूण 22,03,553 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  89.97 % एवढे झाले आहे. आज राज्यात 27,126 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज 92 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.18 टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,८२,१८,००१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २४,४९,१४७ (१३.४४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९,१८,४०८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ७,९५३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज एकूण १,९१,००६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. दुसरीकडे विदर्भ आणि पुणे जिल्ह्यातही कालपेक्षा आज कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यात 24 तासात 3111 पाझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली असून दिवसभरात 1094 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात कोरोनाबाधीत २१ रुग्णांचा मृत्यू झाला असून 5 रुग्ण पुण्याबाहेरील आहे. दुसरीकडे 538 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

विदर्भातून मुंबईत जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची कोरोना चाचणी

मुंबई ।  राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या परदेशातून येणाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. तर  विदर्भातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता येथून मुंबईत येणाऱ्या नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. मुंबईतील परेल, मुंबई सेंट्रल, बोरीवली, कुर्ला या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तपासणी करण्यात येणार असल्याचे  सांगितले  जात आहे. विदर्भातून येणाऱ्या नागरिकांचीही तपासणी करण्यात येईल. त्यानुसार अमरावती, अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांची मुंबईत तपासणी करण्यात येणार आहे. महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यातही कोरोनाचा कहर वाढत आहे. ही साखळी तोडण्यासाठी नियमांचे  पालन करणे आवश्यक आहे. यासाठी राज्य सरकारकडूनही वारंवार मास्क लावण्याचे  आवाहन केले  जात आहे. त्यामुळे दिल्ली, राजस्थान, गुजरात, केरळ, गोवा, विदर्भ येथून येणाऱ्या प्रवाशांची मुंबईतील ठरावीत स्थानकांवर तपासणी केली जाणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!