Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : सचिन वाझे यांच्या अटकेवर शरद पवार , अनिल देशमुख , संजय राऊत यांच्या अशा आहेत प्रतिक्रिया

Spread the love

मुंबई : मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने अटक केल्यानंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी दोन  ट्विट केले आहेत. आपल्या ताज्या  ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे कि , सचिन वाझे एक प्रामाणिक आणि काबील अधिकारी आहेत. मुंबई पोलीस या सर्व प्रकरणाचा तपास योग्य दिशेने करीत होती. हि मुंबई पोलिसांची जबादारी होती . केंद्रीय पथकाची या चौकशीसाठी गरज नव्हती.

“लोक तुमची प्रतिमा उद्ध्वस्त करू शकतात. तुमच्या व्यक्तिमत्वाला डाग लावू शकतात. पण तुम्ही केलेलं चांगल काम ते हिरावून घेऊ शकत नाही. तुमचं वर्णन त्यांनी कसंही केलं, तरी तुम्हाला ओळखणारे तुमचा आदर्श कायम ठेवतील,” असं राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान केंद्रीय यंत्रणेला राज्यात आणून मुंबई पोलिसांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे.

दरम्यान राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील संबंधित प्रकरणाच्या चौकशीत जे काही सत्य बाहेर येईल, जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे  स्पष्टीकरण दिले आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सचिन वाझे यांच्या अटकेवर बोलण्यास टाळले आहे. माध्यमांनी सचिन वाझे यांच्या अटकेवर प्रश्न विचारला असता, तो स्थानिक विषय आहे. मी जास्त यावर भाष्य करणार नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.

शनिवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सकाळपासून वाझे यांच्याकडे चौकशी केली. एनआयएने तब्बल १३ तास चौकशी केल्यानंतर सचिन वाझेंना अटक अटक केले सचिन वाझेंच्या अटकेनंतर ठाण्यातून आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये इनोव्हा गाडीतून जाणारे दोन्ही चालक आणि एका व्यावसायिकाचा समावेश असल्याचे सांगितले जाते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!