Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : मोक्कातील कुख्यात नळगुरुच्या ग्रामीण गुन्हे शाखेने आवळल्या मुस्क्या, पोलिस अधिक्षकांकडून रिवाॅर्ड

Spread the love

औरंगाबाद – आठ वर्षांपासून मोक्का मधील फरार आरोपी नरेंद्र दत्तात्रेय मुळे उर्फ नळगुरु (५१) रा.वैजापूर हल्ली मु.रत्नागिरी याला रत्नागिरीतून रविवारी (१४ मार्च)अटक करुन पुढील तपासासाठी पैठण पोलिसांच्या हवाली केले आहे.
८ फेब्रू २०१३मधे पैठण पोलिस ठाण्यात दरोड्याच्या दाखल असलेल्या गुन्ह्यात ८ जणांवर गुन्हा दाखल होता. त्यापैकी सात जण अटक होते. यामधे कुख्यात लक्ष्मण गाडे याने तरबेज गुन्हेगारांची गॅंग तयार करुन दरोडा टाकला होता. या मधे शिवाजी भोजने, शेख शकील शैख हसम,ज्ञानेश्वर थोट,नकीम मंसूर सय्यद,रमेश गव्हाणे, रामदास बर्डे आणि नळगुरु उर्फ नरेंद्र मुळे यारेकाॅर्डवरील गुन्हेगारांचा  समावेश होता.

दरम्यान औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षकांनी वरील गुन्हेगारांना मोक्का लावला होता. मोक्का न्यायालयाने १० वर्ष सक्त मजुरी ५ लाख रु.दंडाची शिक्षा दिली आहे. पण नळगुरु तेंव्हापासून फरार होता. त्याला गुन्हेशाखेने जेरबंद केले वरील कारवाई पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भागवत फुंदे,पीएसआय गणेश राऊत, पोलिस कर्मचारी विठ्ठल देशमुख, विक्रम राख, वाल्मिक निकम योगेश तरमाळे यांनी पार पाडली.या कारवाईचे कौतूक म्हणून अधिक्षकांनी गुन्हेशाखेला ५ हजार रु.चे रिवाॅर्ड दिल्याचे फुंदे यांनी सांगितले

आपलं सरकार

Click to listen highlighted text!