Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : एक महिन्यापासून बेपत्ता असलेली गतीमंद विवाहिता आई वडलांकडे सूपूर्द

Spread the love

औरंगाबाद – एक महिन्यापासून वेडाच्या भरात घरातून निघून गेलेली घटस्फोटित विवाहिता पुंडलिकनगर पोलिसांनी तिच्या आई वडलांकडे सूपूर्द केली.
गेल्या महिन्यात वेडाच्या भरात घरातून हैद्राबाद आणि तिथून औरंगाबादेत आलेली गतीमंद महिला रात्रीच्या दामिनी पथकाने ११ मार्च रोजी विजयनगर चौकात दिसल्यानंतर पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात आणून सोडली होती.

एपीआय घन्नशाम सोनवणे यांनी तिला छावणीतील महिला सुधारगृहात ठेवल्यानंतर ती तेथील अधिकार्‍यांना आत्महत्येची धमकी देत होती. त्यामुळे एपीआय सोनवणे यांनी तिला क्रांतीचौकातील सावित्रीबाई फुले महिला गृहात ठेवले तिला वसतीगृहातील महिला अधिकार्‍यांच्या मदतीने बोलते केले.पण ती असंबध उत्तरे देत होती. त्यानंतर पुंडलिकनगर  पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून मतदार यादी मिळवून तिचा लग्नानंतरचा पत्ता शौधला पण तो तिच्या नवर्‍याचा निघाला ज्याने दहावर्षांपूर्वी गतीमंद महिलेला घटस्फोट दिला होता. त्याच्याकडून तिच्या माहेरचा पत्ता मिळवल्यानंतर तीची जालन्याच्या सदर बाजार पोलिस ठाण्यात मिसींग दाखल असल्याचे तपासात उघंड झाले. एपीआय सोनवणे यांनी गतीमंद महिलेच्या आई-वडीलांना आज रविवारी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात बोलावून त्यांच्या हवाली केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!