Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : सचिन वाझे यांना अखेर एनआयए कडून अटक

Spread the love

मुंबई :  मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात सचिन वाझे यांच्या विरोधात प्रथमदर्शनी पुरावे दिसत असल्याचे नमूद करत ठाणे न्यायालयाने त्याआधारावर कोर्टाने वाझे यांना अंतरिम संरक्षण नाकारले व वाझे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर १९ मार्च रोजी पुढील सुनावणी ठेवली. पुढील सुनावणीत कोर्ट एटीएसचं म्हणणं ऐकून घेणार आहे. सचिन वाझे यांनी शुक्रवारी ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यामुळे आता १९ मार्च रोजी होणारी सुनावणी महत्त्वाची ठरली आहे. मात्र  त्या आधीच मुंबई पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अखेर अटक केली आहे.


मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) ही कारवाई केली आहे. एनआयए कडून सचिन वाझे यांची शनिवारी दिवसभर कसून चौकशी करण्यात आली. कंबाला हिल येथील एनआयए कार्यालयात सचिन वाझे सकाळी ११.३०च्या सुमारास गेले होते. तिथे तब्बल १२ तास मॅरेथॉन चौकशी केल्यानंतर रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी वाझे यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत एनआयएच्या एका अधिकाऱ्याने अधिकृत माहिती दिली आहे. सकाळी ९ ते १२दरम्यान सचिन वाझे यांना सायन रुग्णालयात कोविड टेस्ट करता नेलं जाईल.  दुपारी १२ ते ३ दरम्यान सचिन वाझे यांना मुंबई सत्र न्यायालयातील NIA कोर्टात हजर केले जाईल.

प्रकरण बनले अधिकच गंभीर

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर कारमिखाइल रोडवर स्फोटकांसह स्कॉर्पिओ कार पार्क करण्यात आली होती. या प्रकरणात सहभाग असल्याच्या संशयावरून सचिन वाझे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या अटकेच्या कारवाईने एकच खळबळ उडाली असून हा राज्य सरकारसाठीही मोठा धक्का मानला जात आहे. वाझे यांच्यावर या प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले होते. वाझे यांना निलंबित करून अटक करा अशीही मागणीही त्यांनी केली होती. मात्र, आधी चौकशी मग शिक्षा असा पवित्रा घेत सरकारने वाझे यांची केवळ खात्यांतर्गत बदली केली होती. आता वाझे यांना एनआयएने अटक केल्याने हे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.

सचिन वाझेंनी केला व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून धक्कादायक आरोप

दरम्यान, अंबानी यांच्या घराजवळ ज्या कारमध्ये स्फोटकं ठेवण्यात आली होती त्या कारचा मालक मनसुख हिरन यांच्या मृत्यूप्रकरणी एटीएस मार्फत सचिन वाझे यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. त्यापाठोपाठ एनआयएने स्फोटकांप्रकरणी सचिन वाझे यांची चौकशी सुरू केली होती. त्यामुळे संभाव्य अटक टाळण्यासाठी वाझे यांनी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात शुक्रवारी अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. या अर्जावर शनिवारी सुनावणी झाली असता वाझे यांना अंतरिम संरक्षण देण्यास ठाणे न्यायालयाने नकार दिला होता. प्रथमदर्शनी मनसुख यांच्या मृत्यू प्रकरणात वाझे यांचा सहभाग असल्याचे दिसते असेही न्यायालयाने यावेळी नमूद केले होते. दुसरीकडे वाझे यांची एनआयएकडून चौकशी सुरू होती. मुंबईतील एनआयए कार्यालयात वाझे यांच्यावर एनआयएच्या पथकाने प्रश्नांचा भडीमार केला. त्यानंतर रात्री उशिरा वाझे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.

सचिन वाझे यांची उत्तरे

गाडी आपणच वापरत असल्याचे  आणि मनसुख मिश्रिलाल हिरेन यांच्याशी संपर्कात असल्याचे कबूल केले मात्र १७ फेब्रुवारीच्या रात्री मनसुख हिरेन हे आपणास भेटल्याचा आरोप त्यांनी फेटाळला.  १७ फेब्रुवारीला २ वेळा मनसुख हिरेन सचिन वाझे यांना भेटले असाही त्यांच्यावर आरोप आहे. दरम्यान गाडीत स्फोटके ठेवल्या बाबत NIA ने सचिन वाझे यांना विचारले असता त्याबाबत आपल्याला काही माहिती नसल्याचे सांगितले. गाडी चोरी झाल्यापासून म्हणजे १८ ते २५ फेब्रुवारीपर्यंत सचिन वाझे यांना चोरीला गेलेल्या गाडी संदर्भात काही माहिती होती का? हे सांगण्यास सचिन वाझे यांनी नकार दिली पण  हो गाडी चोरलेल्यांच्या ते संपर्कात होते असे  NIA ने सांगितले.

याशिवाय ४ मार्चच्या दिवशी सचिन वाझे हे मनसुख हिरेन यांच्या संपर्कात होते का? ( सचिन वाझे यांनी नाही असं उत्तर दिलं ) . गाडीत ठेवलेल्या स्फोटकांबाबत काही माहिती आहे याबाबत NIA ने सचिन वाझे यांना प्रश्न विचारला असता, सचिन वाझे यांनी नकारात्मक उत्तर दिले पण NIA ने काही पुरावे दाखवले असता सचिन वाझे यांनी आपला त्याच्याशी काही संबंध नसल्याचे सांगितले .

सचिन वाझे यांच्यावर असे आहेत आरोप

– सेक्शन 286: स्फोटके सापडल्या प्रकरणी दुर्लक्ष केले

– सेक्शन 465 : बनावट / फसवणूक करणे

– सेक्शन 473 : बनावट शिक्का वगैरे बनविणे किंवा त्याच्या ताब्यात ठेवणे, बनावट शिक्षेस पात्र ठरावे या उद्देशाने

– सेक्शन 506 (2) : गुन्हेगारी वृत्ती

– सेक्शन 120 ( ब) : गुन्हेगारी कट रचणे

– स्फोटक पदार्थ कायदा 1908 : स्फोटके बाळगणे अथवा बनवणे

सचिन वाझे यांनी स्फोटक बाळगळी असा आरोप NIA ने केला असून लवकरच पांढऱ्या रंगांच्या इनोव्हाचा लेखाजोखा एनआयए आज जाहीर करणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!