Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#AurangabadNewsUpdate : लॉकडाऊनला शहरवासीयांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

Spread the love

बाजारपेठांमध्ये कडकडीत बंद, तुरळक वाहतूक सुरू

औरंंगाबाद  शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा आपत्ती प्राधीकरण प्रमुख जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांनी अंशत: लॉकडाऊन आदेश जारी केले. त्यामध्ये शनिवार व रविवार असे दोन दिवस कडकडीत बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले होते. त्यानुसार, नागरिकांनी कडक लॉकडाऊनच्या पहिल्या शनिवारी (दि.१३) घरात राहूनच प्रशासनाला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. दरम्यान, पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांनी सकाळपासूनच शहरातील विविध भागांची पाहणी केली.

गतवर्षी मार्च महिन्यापासूनच शहरात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरण्यास सुरूवात झाली होती. त्यानंतर सहा ते सात महिन्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश मिळाले होते. नागरिकांमधील कोरोनाची भिती कमी झाली. मात्र, पेâब्रुवारी महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत गेल्याने ७ मार्च रोजी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली. या बैठकीत उच्च पदस्थ अधिका-यांनी ११ मार्च ते ४ एप्रिलपर्यंतच्या अंशत: लॉकडाऊनची घोषणा केली. त्याचाच एक भाग म्हणून शनिवार व रविवारी पुर्णत: लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले होते. अंशत: लॉकडाऊनच्या पहिल्या शनिवारी नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
दरम्यान, पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व मनपा प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांनी टिव्ही सेंटर येथून सुरूवात केली. त्यानंतर सिडको, कटकट गेट, रोशनगेट, जिन्सी, पैठणगेट, गारखेडा परिसर, पुंडलिकनगर या ठिकाणांची पाहणी केली.


लॉकडाऊनचा परिणाम, बसस्थानकावर प्रवाशांची तुरळक गर्दी दिवसभरात एसटीच्या ६७८ फेऱ्या रद्द

औरंंगाबाद : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्या आदेशाने शनिवार आणि रविवार असे दोन दिवस जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी म्हणजे शनिवारी (दि.१३) मध्यवर्ती बसस्थानकासह सिडको बसस्थानकात प्रवाशांची तुरळक गर्दी दिसून आली. शनिवारी दिवसभरात औरंगाबाद विभागातून एसटीच्या जवळपास ६७८ फेऱ्या रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती विभाग नियंत्रक कार्यालयातून देण्यात आली आहे.

जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या झपाट्याने वाढली असून आज घडीला जिल्ह्यातील जवळपास पाच हजार कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. कोरोनाबाधित रूग्णसंख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्या आदेशाने जिल्ह्यात ११ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान अशंतः लॉकडाऊन करण्यात आला आहे. तर शनिवार आणि रविवार या दिवशी संपूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आला आहे. शनिवारी लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी मध्यवर्ती बसस्थानकासह सिडको बसस्थानकावर प्रवाशांची तुरळक गर्दी दिसून आली.

दरम्यान, शनिवारी दिवसभरात सिडको बसस्थानक – ११२ फेऱ्या , मध्यवर्ती बसस्थानक – १२० फेऱ्या , कन्नड-१२४ फेऱ्या , पैठण-१०४ फेऱ्या , सिल्लोड-९० फेऱ्या, वैजापूर-३७ फेऱ्या ,गंगापूर-४० फेऱ्या , सोयगांव-५१ फेऱ्या अशा एकूण ६७८ फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. तसेच प्रवाशांच्या मागणीप्रमाणे विविध मार्गावर एस.टी.बसेस सोडण्यात येत होत्या. तर परजिल्ह्यातून आणि परराज्यातून आलेल्या बसमध्ये देखील प्रवाशांची संख्या जेमतेमच असल्याचे दिसून आले. विभाग नियंत्रक अरूण सिया, मध्यवर्ती बसस्थानकाचे आगार प्रमुख सुनिल शिंदे आदीसह एसटीचे अधिकारी व कर्मचारी प्रवाशांना मास्क लावा, सॅनिटायझरचा वापर करा असे आवाहन करतांना दिसून आले.


लॉकडाऊनमध्ये विद्यार्थिनीला स्वतः परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचविले

औरंगाबादमध्ये आज शनिवारी लॉकडाऊन सुरू असताना रेल्वे बोर्डाची परीक्षा द्यायला जाणारी विद्यार्थिनी वाहन मिळत नसल्याने गोंधळली होती. मात्र, पोलीस अंमलदार हनुमंत चाळनेवाड यांनी तिला स्वतः परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचविले. या कामगिरीमुळे मा.पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांनी पोलीस अंमलदार यांना ५००० रुपयाचे बक्षीस दिले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!