Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सहावर्षांपासून फरार असलेले दोन दरोडेखोर गुन्हेशाखेने केले जेरबंद

Spread the love

औरंगाबादमध्ये  २०१५ साली उस्मानपुरा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील दोन फरार आरोपींना गुन्हेशाखेने आंबाजोगाई मधून अटक करुन आणले. गजानन प्रभाकर कचरे (३६) व राजेंद्र श्रीराम कळस (३०) दोघेही रा.आंबाजोगाई अशी अटक आरोपींची नावे आहेत.

आॅक्टो २०१५मधे मिश्रीलाल बरडिया (८१)रा.दशमेशनगर यांच्या घरी पहाटे ४वा. ७रेकाॅर्डवरच्या गुन्हेगारांनी दरोडा टाकून १लाख रु.रोख व ५० हजार रु.चे दागिने लंपास केले होते. या प्रकरणी पोलिस निरीक्षक गौतम फसले यांनी सहा आरोपी अटक केली होती. त्यामधे सूर्यकांत श्रीराम मुळे (२८), विनोद दिगंबर गायकवाड (३२),गोरख खळेकर (२१),सुनिल भावसाहेब पवार (२४)नंदू भंडारी शिरसाठ(२३)राजेंद्र कळसे (३०) यांना अटक केली होती. तर गजानन कचरे हा फरार होता. वरीलपैकी राजेंद्र कळसे हा जमानतीवर बाहेर आला हौता. पण तो तारखेला हजर राहात नसल्यामुळे कोर्टाने त्याचे नाॅनबेलेबल वाॅरंट जारी केले होते. गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांना खबर्‍याकडूनकळसे व कचरे हे दोन्ही आंबाजोगाईत फिरत असल्याचे कळताच पोलिस उपनिरीक्षक योगेश धोंडे यांनी पथकासहित आंबाजोगाईत सापळा रचून दोघांना जेरबंद केले.वरील कारवाईत सहाय्यक पोलिसआयुक्त रविंद्र साळौखे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय नंदकुमार भंडारे,पोलिस कर्मचारी राहूल खरात,भावसिंग चव्हाण,गजानन मांटे, तात्याराव शिनगारे, नितीन देशमुख यांनी सहभाग घेतला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!