Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

दोन वेळा कोरोना लस घेऊनही घाटीच्या डीन डॉ. कानन येळीकर कोरोना बाधित

Spread the love

मराठवाड्यातील सर्वात मोठ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांना कोरोनाची बाधा झाली आहे. विशेष म्हणजे दोन लस घेतल्यावर त्यांना बाधा झाली. त्यांना ११ मार्च रोजी सौम्य लक्षणे होती. कोरडा खोकला, ताप आणि घसा दुखत असल्याने त्यांनी घाटीत स्वॅब दिला. त्यानंतर १२ मार्च रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे उपचारासाठी त्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात झाल्या. तर शनिवारी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचाही स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला आहे. दरम्यान त्यांच्या ८४ वर्षीय सासू देखील पॉझिटिव्ह आल्या आहेत. १६ जानेवारी रोजी कोरोना लसीकरणाचा शुभारंभ झाल्यानंतर ३० जानेवारी रोजी त्यांनी घाटीत पहिली लस घेतली होती. त्यानंतर २८ दिवसांनी त्यांनी दुसरी लस घेतली. मात्र, दोन दिवसांपुर्वी त्यांना कोरडा खोकला, ताप आणि घसा दुखत होता.

आॅक्सीजन विरहीत बेडवर उपचार

घाटीत सर्व बेड आॅक्सीजनयुक्त आहेत. सध्या आपल्याला आॅक्सीजनची गरज नाही. घाटीतील बेड गरजू रुग्णांना मिळावा, यासाठी आपण खासगी रुग्णालयातील आॅक्सीजन विरहीत बेडवर उपचार घेत असल्याचे डॉ. येळीकर यांनी सांगितले

आपलं सरकार

Click to listen highlighted text!