Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMharashtraUpdate : राज्याची चिंता वाढली , साडे तेरा हजार नवे रुग्ण , ५४ मृत्यू

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई:  गेल्या २४ तासांत  राज्यात तब्बल १३ हजार ६५९ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे तर ९ हजार ९१३ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. आज ५४ करोनामृत्यूंची नोंद झाली असून अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा लाखाच्या उंबरठ्यावर पोहचला आहे. राज्यात आज गेल्या काही महिन्यांतील सर्वाधिक रुग्णवाढ पाहायला मिळाली आहे. २४ तासांत तब्बल १३ हजारांवर नवीन बाधितांची भर पडली असल्याने राज्याची चिंता वाढली आहे.


दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोना स्थितीवर चिंता व्यक्त करताना सरकारची पुन्हा लॉकडाऊन लावण्याची इच्छा नाही मात्र नागरिकांनी करोनाचे नियम काटेकोरपणे पाळले पाहिजेत, असे विधान करत मुख्यमंत्र्यांनी एकप्रकारे सूचक इशाराच दिलेला आहे. असे असतानाच आजची आकडेवारी महाराष्ट्राची चिंता वाढवणारी आहे.

Advertisements

राज्यात आज ५४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांचा एकूण आकडा आता ५२ हजार ६१० इतका झाला आहे. सध्या राज्यातील करोना मृत्यूदर २.३४ टक्के एवढा आहे. आज राज्यात १३ हजार ६५९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ९ हजार ९१३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजपर्यंत एकूण २० लाख ९९ हजार २०७ करोना बाधित रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.२१ टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ७१ लाख १५ हजार ५३४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२ लाख ५२ हजार ५७ (१३.१६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाख ७१ हजार १८७ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर ४ हजार २४४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Advertisements
Advertisements

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या लाखाच्या अगदी जवळ पोहचली आहे. आज हा आकडा ९९ हजार ८ इतका झाला आहे. गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांत करोना रुग्णसंख्येत मोठी वाढ पाहायला मिळाली. त्यात मुंबई पालिका हद्दीत १ हजार ५३९, नागपूर पालिका हद्दीत १ हजार ५१३ तर पुणे पालिका हद्दीत १ हजार ३८४ नवीन बाधितांची भर पडली आहे. या शिवाय पिंपरी चिंचवड, ठाणे, नाशिक, जळगाव, औरंगाबाद या शहरांतही करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. राज्यात सध्या पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १८ हजार ४७४ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यापाठोपाठ नागपूर जिल्ह्यात १२ हजार ७२४ रुग्ण आहेत. ठाणे जिल्ह्यात हा आकडा १० हजार ४६० इतका आहे तर मुंबईत ९ हजार ९७३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!