Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

दुसऱ्या पत्नीच्या ‘या’ अरुपांचे धनंजय मुंडेंनी दिलं स्पष्टीकरण

Spread the love

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेले बलात्काराच्या आरोपाचे प्रकरण मिटत नाही तोच आता त्यांची दुसरी पत्नी करून यांनी त्यांच्या विरोधात मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. यामुळे मुंडेपुढे पुन्हा नवी अडचण निर्माण झाली आहे. मुंडे यांनी त्यांच्या दोन मुलांना चित्रकूट बंगल्यात गेल्या तीन महिन्यांपासून डांबून ठेवले आहे, असा थेट आरोप मुंडेंच्या दुसऱ्या पत्नी करुणा यांनी केला आहे.

धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत , दुसऱ्या पत्नीनेही केली ” हि ” तक्रार

करुणा मुंडे यांच्या या आरोपानंतर आता धनंजय मुंडे यांनी देखील स्पष्टीकरण दिले आहे. धनंजय मुंडे या आरोपा बद्दल म्हणाले की, करुणा शर्मा यांच्या बाबतीत मी पुर्वीच खुलासा केला आहे. त्यांच्यासोबत असलेल्या विवादात मी स्वतःहून उच्य न्यायालयात याचिका दाखल केली असुन त्याबाबतीत सदर खुलाशात सविस्तर नमुद केले आहे. सदर याचिकेत उच्य न्यायालयाने करुणा शर्मा यांना मनाई आदेशही दिला आहे. त्यानंतर विवादावर तोडगा काढण्यासाठी दोघांच्या सहमतीने मेडिएटर नेमण्याची विनंती केल्यावरून उच्य न्यायालयाने, मद्रास उच्च न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायाधीश ताहिलरामानी यांची मेडिएटर म्हणुन नियुक्तीसुद्धा केली आहे, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.

सदर मेडिएशनच्या दोन बैठक झालेल्या असुन दिनांक 13 फेब्रुवारी 2021 रोजी पुढील बैठक निश्चित झालेली आहे. या मेडिएशनमध्ये मुलांच्या संदर्भातील सर्व विवादांसह इतर सर्व मुद्दे चर्चेत व निर्णयार्थ आहेत. असे असताना आणि सहमतीने उच्य न्यायालयाच्या आदेशानुसार अतिवरिष्ठ न्यायिक अधिकाऱ्यांसमोर मेडिएशनची प्रक्रिया सुरु असताना अश्याप्रकारे मुलांच्या ताब्यावरून तक्रार करणे या हेतूबद्दल शंका निर्माण करणारे आहे, असे ही धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे. तसेच जो मुद्दा मेडिएशनमध्ये चर्चेत आहे त्याबद्दल जाहीर मागणी करणे म्हणजे करुणा शर्मा याना न्यायिक प्रक्रियेत काहीही रस नसुन माझी निव्वळ मीडिया ट्रायल चालवून बदनामी करणे हाच हेतु दिसुन येतो. कृपया सदर बाब हि न्यायप्रविष्ठ असुन न्यायालयीन प्रक्रियेअंती जो निर्णय होईल तो सर्वांवर बंधनकारकच असणारच आहे. यामुळे याप्रकरणात निव्वळ बदनामी करण्याच्या हेतुने करण्यात येत आहे अशा आरोपांत काहीही तथ्य नसल्याचे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!