Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

शेतकरी आंदोलनावरून प्रियांका गांधी यांची टीका

Advertisements
Advertisements
Spread the love

देशातील शेतकऱ्यांच्या आंदोलनात सक्रिय पाठिंबा देत आणि कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार करत काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील हिंसाचारादरम्यान मरण पावलेल्या नवरीत यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी प्रियांका गांधी अरदासमधील रामपूर येथे गेल्या होत्या.
यावेळी होत असलेल्या आंदोलनात सहभाग घेतल्यानंतर उत्तर प्रदेशच्या रामपूरमध्ये बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, शेतकऱ्यांचं आंदोलन सत्याच्या मार्गाने सुरु असलेले आंदोलन आहे. हे देशाच्या सर्व शेतकऱ्यांचे आंदोलन आहे. हे आंदोलन देशवासियांचे आहे. देशातील सर्व लोकांचे आहे. हे आंदोलन कोणत्याही राजकीय हेतून करण्यात आलेलेले नाही. पण सरकारला हे आंदोलन त्यांच्या विरोधातील षडयंत्र वाटते.आम्हाला अपेक्षा होती की, शेतकऱ्यांसाठी या सरकारचे दरवाजे उघडतील आणि सुनावणी होईल. पण असे काहीच झाले नाही. जर एखादा नेता गरीबांचा आवाज ऐकू शकत नसेल, तर तो आमचा नेता असू शकत नाही.”

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!