Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#Mahanayak News Impact ; येत्या ३० जानेवारी पर्यंत झाडांच्या अवैध कत्तलीची पोलिस आणि वनविभागाने कारवाई करावी – खंडपीठाचे आदेश

Spread the love

जगदीश कस्तुरे । महानायक वृत्त सेवा । औरंगाबाद

औरंगाबाद – गेल्या तीन वर्षांपूर्वी औरंगाबाद जळगाव रस्त्याच्या रुंदीकरणा दरम्यान अजिंठा ते सिल्लोड या रस्त्यावरील झाडांची कत्तल केलेले २२ हजार घनमीटर लाकूड लंपास झाल्या प्रकरणी सिल्लोड पोलिस आणि वनविभागाने येत्या ३० जानेवारीपर्यंत दोषींविरुध्द कारवाई करावी असा आदेश.न्या.टी.व्ही.नलावडे आणि एम.जी. सेवलीकर यांच्या खंडपीठाने दिले.

http://www.mahanayakonline.com/2020/10/09/aurangabadnewsupdate-finally-forest-dept-enquired-about-complian/

वरील प्रकरणी नोव्हेंबर २० मधे महानायक न्यूज ने या प्रकरणाला वाचा फोडली होती.पण यातील फिर्यादी मनोज कापूरे यांच्या तक्रारीची वनविभाग आणि पोलिस प्रशासन दखलंच घेत नव्हते. म्हणून कापुरे यांनी या प्रकरणी खंडपीठात धाव घेतली.तक्रार प्राप्त झाल्यावरही गुन्हा दाखल केला नाही.या प्रकरणी फिर्यादी न्यायालयात जावू नये म्हणून विभागिय वनसंरक्षक प्रकाश महाजन यांनी एक महिन्यात चौकशी पूर्ण करु असा खुलासा केला. तसेच पोलिस अधिक्षक कार्यालयाने या प्रकरणी त्वरीत दखल घेत असल्याचे नुसतेच सांगितले होते.

या विषयीची अधिक माहिती अशी कि , वनपरिक्षैत्र सिल्लोड मधील कर्मचार्‍यांनी लाकडांच्या ठेकेदारांच्या संगनमताने २२हजार७३६ घनमीटर लाकडाची वाहतूक परवानगी असतांना केवळ ६हजार घनमीटर लाकूड रेकाॅर्डवर घेतले व उर्वरित लाकूड दुचाकी, जप्त केलेल्या ट्रक यांचे क्रमांकाचे परवाने जारी करुन लंपास केले. या प्रकरणी सिल्लोड शहर पोलिसांना फिर्यादीने अर्ज दिला होता.तसेच विभागीय वनसंरक्षक कार्यालयात ही धाव घेतली. दोन्ही ठिकाणी तक्रारीला केराची टोपली दाखवल्याचे कळतांच फिर्यादी न्यायालयात दाद मागत आहे असे समजताच वनविभाग व पोलिस अधिक्षक कार्यालयातील अधिकार्‍यांचे धाबे दणाणले. जळगाव रस्त्याच्या रुंदीकरणासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करावी लागली.याचा ठेका सार्वजनिक बांधकाम विभागाने हरियाणातील ऋत्वीक लॅन्को ला दिला. तर तोडलेली वृक्ष विकण्याचा ठेका नाशिक जिल्ह्यातील चांदवडच्या जय बाबाजी फायरवूड सप्लायर्सला दिला होता. या फर्मचे मालक उत्तम बच्छाव यांनी साथीदारांना सोबंत घेत १८ हजार घनमीटर लाकडाची विल्हेवाट लावली. या प्रकरणात लतीफ सय्यद कोपरगाव, संतोष पैठणकर,सुरेश शिंदे आणि जाकिर शेख, सत्तार शहा आसिफ शेख सर्व रा. येवला हे आरोपी आहेत या आरोपींनी स्कूटी आणि मोटरसायकलचे नंबर ट्रक क्रमांक असल्याच्या नोंदी घेत लाकूड कागदोपत्री वाहतूक केल्याचे दस्तऐवज शासनाला सादर केलेले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!