Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SocialMediaNewsUpdate : सोशल मीडिया यूजर्स हॅकर्स , सायबर माफियांपासून सावधान….

Spread the love

प्रसिद्ध सिने पार्श्व गायिका आशा भोसले यांचं इंस्टाग्राम अकाऊंट सोमवारी हॅक झालं असल्याचं वृत्त आहे. हे अकाऊंटहॅक झाल्याचं लक्षात येताच काही तासांतच ते रिकव्हर करण्यातही आलं. पण त्यावरच्या सगळ्या पोस्ट डिलीट कराव्या लागल्या. या हॅकर्सच्या वाढलेल्या कारवायांमुळे सोशल मीडिया वापरतानाचा धोका वाढल्याची जाणीव झाली आहे. फक्त सेलेब्रिटींची अकाउंट्स नव्हे तर सामान्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सनासुद्धा हॅकर्सपासून धोका निर्माण झाला असल्याने सोशल मीडिया यूजर्सनी सावध राहण्याची गरज आहे .


दरम्यान आता इन्स्टाग्रामबाबत महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलनं एक अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने आवाहन केले आहे कि , तुमच्या इन्स्टा अकाउंटचं युजरनेम आणि पासवर्ड कुणाशीही शेअर करू नका. याबाबत तुम्हाला कथित कॉपीराईटचा  भंग होत असल्याचे एसएमएस किंवा ईमेल्स येतील. मात्र त्यांना बळी पडू नका. हॅक करणारे गुन्हेगार या माहितीचा उपयोग व्यक्तींना ब्लॅकमेल करण्यासाठी करत असल्याचे सायबर सेल पोलिसांनी सांगितलं.

हॅकर्सकडून येणाऱ्या या फेक SMS मध्ये असा मजकूर असतो, ‘तुमचं अकाऊंट  कॉपीराईटचा भंग केल्यामुळे येत्या 24 तासात बंद होईल.’ ईमेल नोटिसमध्ये लिहिलेलं असतं, ‘कॉपीराईटचा भंग केल्यामुळे तुमचं अकाऊंट नेहमीसाठी डिलीट केलं जाईल.’ या फेक नोटिसमध्ये इन्स्टाग्रामचा लोगो वापरलेला असल्याने ती एकदम खरी वाटते असंही पोलिसांनी सांगितलं आहे. याबाबत सायबर सेलनं ट्विट करत सांगितलं, की हे अटॅकर्स एका ओळीत इन्स्टाग्राम युजर्सना लक्ष्य करत आहेत. स्कॅमर्सकडे एकदा तुमची गुप्त माहिती पोचली, की ते लगोलग तुमच्या अकाउंट आणि प्रोफाईल फोटोसोबत छेडछाड करतात. आणि मग हे सगळं थांबवण्याच्या बदल्यात ते तुमच्याकडून पैशांची मागणी करतात.

‘फिशिंग मेल किंवा एसएमएसमधून हे जाळं टाकलं जातं, ज्यात सांगितलेलं असतं, की इंस्टाग्रामच्या कॉपीराईटचा भंग केल्यानं २४ तासात तुमचं अकाउंट बंद होणार आहे. यातून इन्स्टा युजरला एक कॉपीराईट नोटीसही पाठवली जाते. हा दावा खोदून काढायचा असल्यास युजर्स तिथे दिलेल्या कॉपीराईट ऑब्जेक्शन फॉर्मवरही क्लिक करू शकतात. या खोट्या मेसेजमध्ये बऱ्याच व्याकरणाच्या आणि भाषेच्या चुका आढळतील. लिंकवर क्लिक केल्यास युजरला फेक इन्स्टा पेजवर रिडायरेक्ट केलं जातं. या पेजच्या युआरएलचा शेवट ‘.com’ नं नाही तर ‘.cf’ नं होतो. या पेजवर युजरला त्याचा ईमेल आयडी जन्मतारीख आणि इन्स्टाचा पासवर्ड मागितला जातो. सगळी खासगी माहिती जमवल्यावर हे फिशिंग पेज तुम्हाला तुमच्या खऱ्या अकाउंटवर रिडायरेक्ट करत. युजरकडून भरून घेतलेला कॉपीराइट ऑब्जेक्शन फॉर्म खरा असल्याचा भ्रम निर्माण करण्यासाठी हे केलं जातं.’ पोलीस सहआयुक्त यशस्वी यादव यांनी सांगितलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!