Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पक्ष्यांना वाचविण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर टाळा पोलिस आयुक्त डॉ. गुप्ता यांचे भावनिक आवाहन

Spread the love

पर्यावरणासाठी आणि पशु-पक्ष्यासाठी घातक असलेला नायलॉन मांजाचा वापर करू नका असे भावनिक आवाहन औरंगाबाद शहराचे पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी पतंगप्रेमींना केले आहे. पोलिस आयुक्तालय औरंगाबाद आणि औरंगाबाद पेट लव्हर्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती चर्चासत्राचे आयोजन रविवारी (दि.३) क्रांतीचौकात करण्यात आले होते. या कार्यक्रमात पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून त्यांच्याशी भावनिक संवाद साधला.
क्रांतीचौकात झालेल्या या जनजागृती चर्चासत्रास पोलिस उपायुक्त दीपक गिऱ्हे वन्यजीव संरक्षक किशोर पाठक, मनपा प्राणिसंग्रहालयाचे प्रमुख डॉ.बी.एस.नाईकवाडे, श्रीमती बेरील संचिस, गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त सुरेश वानखेडे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, दादासाहेब शिनगारे, दीपक तारे, सुरेंद्र माळाळे, देवकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज बहुरे, उपनिरीक्षक चव्हाण यांच्यासह औरंगाबाद पेट लव्हर्स असोसिएशनच्या सदस्या मोनिका काळे, पुरबी बॅनर्जी, शमा कुरे, अजय राणा, अनुदिप म्हस्के, यश रोकडे, मासूम सईद, रिमा सातदिवे, गार्गी बागूल, मंगल सोनवणे, तनुश्री सोनवणे, भालचंद्र सोनार, शिव सुरवुंदे आदींची उपस्थिती होती.

नायलॉन मांजामुळे मनुष्य व प्राणी यांच्या जीवीताला गंभीर हानी होत आहे. काही दिवसापुर्वी नाशिक येथे नायलॉन मांजामुळे गळा कापल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर दरवर्षी संक्रांतीच्या वेळेस हजारो पशु-पक्षी नायलॉन मांजा लागल्याने गंभीर जखमी होतात असे श्रीमती बेरील संचिस यांनी यावेळी सांगितले. पर्यावरणाचा चक्र चालविण्यासाठी पशु-पक्षी हे महत्वाची भूमिका बजावतात असे बेरील यांनी यावेळी सांगितले. यावेळी शालेय विद्याथ्र्यांनी पर्यावरण वाचवा, पक्षी वाचवा असे संदेश देणारे फलक झळकावून नायलॉन मांजा वापरू नका असे आवाहन केले.

चौकट करण्यासाठी नायलॉन मांजा विकणाऱ्यांची गय करणार नाही पतंगप्रेमींनी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी नायलॉन आणि सिंथेटीक मांजा पंतग उडविण्यासाठी वापरू नये असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी यावेळी केले. तसेच शहरात नायलॉन आणि सिंथेटीक मांजाची साठवणूक करून विक्री करणाऱ्यांवर कायदेशिर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!