Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCoronaUpdate : गेल्या २४ तासात ४३५८ रुग्णांना डिस्चार्ज तर ३८८० नवे रुग्ण

Spread the love

राज्यात गेल्या २४ तासात  ४ हजार ३५८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत १७ लाख ७४ हजार २५५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.१४ टक्के इतके झाले आहे. आज राज्यात ३ हजार ८८० नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यात आज ६५ मृत्यूंची नोंद झाली आहे. आज घडीला मृत्यूदर २.५७ टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १९ लाख ३३ हजार ९५६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख ८४ हजार ७७३ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ६ हजार ९१४ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ४ हजार ३३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आजघडीला ६० हजार ९०५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

आज राज्यात ३ हजार ८८० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या १८ लाख ८४ हजार ७७३ झाली आहे. आज नोंद झालेल्या ६५ मृत्यूंपैकी ४५ मृत्यू हे मागील ४८ तासातील आहेत. १० मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. तर उर्वरित १० मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपुरते आहेत. हे १० मृत्यू औरंगाबाद-४, नाशिक-१, नांदेड-१, परभणी-१, पुणे-१, सातारा-१ आणि ठाणे-१ असे आहेत असंही महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!