Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : प्लेअर बार टेंडर गिनीज बुक रेकॉर्डार तरुण उद्योजक पंकज कांबळेची आत्महत्या

Spread the love

प्लेअर बार टेंडर म्हणून अवघ्या १५ मिनिटांमध्ये त्याने १२० पद्धतीचे मॉकटेल तयार करून दाखवल्याने  गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नावाची नोंद झालेला व चार कंपन्यांचा मालक असलेला मुंबईचा तरूण व्यावसायिक पंकज कांबळे याने इंदूरमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेम प्रकरणातून व नैराश्यातून त्याने आपले जीवन संपवल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

विशेष म्हणजे आत्महत्या करण्या अगोदर पंकजने लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये आपल्या बँक खात्यात १ कोटी रुपये असल्याचे सांगितले आहे. तसेच, नीलम नावाच्या तरूणीचाही उल्लेख करत, आय लव्ह यू नीलम असं लिहिलेलं आढळून आलं आहे. या सुसाइड नोटच्या आधारावर आता पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. या शिवाय पंकजने ज्या खोलीत आत्महत्या केली तिथं दीड लाख रुपये रोकड देखील सापडल्याची माहिती समोर आली आहे.

इंदुरमधील एका मोठ्या हॉटेलच्या रुममध्ये पंकजने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची इंदुरच्या कनाडिया पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. घटनेची माहिती मिळाताच पंकजे कुटुंबीय इंदुरमध्ये दाखल झाले. पंकजने आत्महत्या करण्याअगोदर आपल्या कुटुंबीयांना अनेक मेसेज केल्याचेही पोलिसांच्या चौकशीतून समोर आलं आहे. शिवाय, त्याने आपल्या कामाच्या तणावाबाबतही या मेसेजेसमध्ये उल्लेख केल्या असल्याचे सांगितले जात आहे.

पंकजचा चुलत भाऊ बेनी प्रसाद यांच्या म्हणण्यानुसार, काँग्रेस आमदार संजय शुक्ला यांच्या मुलाच्या विवाहसमारंभासाठी पंकज इंदुरला गेला होता. या कार्यक्रमच्या इव्हेंट मॅनेजमेंटची जबाबदारी त्याने घेतली होती. मात्र, तब्येत बिघडल्याचे सांगून तो अचानक कार्यक्रमातून बाहेर पडला व आपल्या रुमवर गेला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. मुंबईतील सांताक्रुझ भागात तो राहत होता.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!