Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : मुलीला ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल दिला आणि “बाप” असा गोत्यात आला … !!!

Spread the love

कर्नाटकातील मांडयामध्ये मुलीला ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल फोन देणं, एका पित्याला चांगलच महाग पडलं असल्याचं वृत्त आहे. त्याच्या या मोबाइलमधून त्याची दुसरीच भानगड बाहेर आली. त्याचे असे झाले , कि मुलगी ऑनलाइन वर्गाला उपस्थित राहण्यासाठी वडिलांचा मोबाईल सर्फिंग करीत असताना तिला आपल्या बाबांचा भलत्याच महिलेसोबतचा नको तो व्हिडीओ सापडला आणि कहरच झाला . तिने लगेच याबद्दल आईला सांगितले. हा प्रकार बाहेर आल्यानंतर कुटुंबात मोठा वाद निर्माण झाला आहे. मांडयाच्या नागामंगला तालुक्यात हे कुटुंब राहते. दरम्यान पोलीस आणि सामाजिक संस्था आता या पती पत्नीचा वाद मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

या जोडप्याला दोन मुली  असून त्यांच्या लग्नाला १८ वर्ष झाली आहेत. पतीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे दुखावलेल्या पत्नीला आता विभक्त व्हायचे आहे. पण नवरा त्यासाठी तयार नाही. नवऱ्याने विवाहबाह्य संबंधाचे गुपित दडवून ठेवले होते. पण ऑक्टोबर महिन्यात मुलीला १२ व्या इयत्तेच्या ऑनलाईन वर्गाला उपस्थित राहता यावे, यासाठी त्याने आपला मोबाईल दिला. हा मोबाईल सर्फिंग करीत असताना तिला वडिलांचा दुसऱ्या एका महिलेसोबत व्हिडीओ दिसला. त्या माणसाने प्रणयाचा तो व्हिडीओ रेकॉर्ड करुन मोबाईलमध्ये सेव्ह केला होता. पतीच्या या प्रकरणाबद्दल समजल्यानंतर महिलेने पोलिसात आणि महिला संघटनांकडे धाव घेतली व कारवाईची मागणी केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!