Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : मिलिंद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य  प्रा.ल.बा. रायमाने यांचे  निधन

Spread the love

भारतरत्न डाॅ . बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या मिलिंद कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि दलित साहित्याच्या संवर्धनात 60 च्या दशकात महत्त्वाची भूमिका बजावणारे प्रा. ल.बा. रायमाने यांचे आज औरंगाबादेत अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 85 होते. त्यांच्या ईच्छेनुसार कुठलेही विधी न करता केवळ सामुहिक बुद्धवंदना म्हणून त्यांचा मृतदेह महात्मा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाकडे ( एमजीएम) सुपूर्द करण्यात आला .

1963 ला मराठीचे प्राध्यापक म्हणून मिलिंद महाविद्यालयात रूजू झाल्यानंतर दलित विद्यार्थ्यांना व्यक्त होता यावं यासाठी त्यांनी भीत्तीपत्रक सुरू केले. मिलिंदच्या संस्कारांतून घडलेल्या विद्यार्थ्यांचे जीवघेणे अनुभव या हस्तलिखित पाक्षिकातून व्यक्त व्हायला लागले. या नव्या अभिव्यक्तीची राज्य पातळीवर नोंद घेण्यात आली. त्यातूनच पुढे दलित साहित्याची चळवळ उदयाला आली. यात डाॅ.म.ना.वानखडे, प्राचार्य म .भि.चिटणीस, प्रा. रा. ग.जाधव इत्यादिंसोबत प्रा. रायमाने यांचाही महत्त्वाचा सहभाग होता.

दलित साहित्य चळवळीत महत्त्वाची भूमिका असलेल्या अस्मिता, मिलिंद साहित्य परिषदेतही त्यांची महत्त्वाची भूमिका होती. बाबासाहेबांचे सहकारी मा. बा.ह.वराळे यांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. मिलिंद मध्ये राज्यभरातून अतिशय बिकट अवस्थेतून दलित विद्यार्थी येत. प्रा. रायमाने यांनी आईच्या ममतेने या मुलांच्या अडचणी समजावून घेतल्या. त्यांना आयष्यात उभं राहण्यासाठी सर्व प्रकारची मदत केली. महानायक ऑनलाईन परिवाराची रायमाने सर यांना भावपूर्ण आदरांजली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!