MaharashtraNewsUpdate : मतदान केंद्राला भेट देण्यासाठी शिक्षक उमेदवार आले चक्क बनियनवर !!

अमरावती विभाग शिक्षक मतदार संघातील उमेदवार उल्हास पाटील यांनी मतदान केंद्रावर चक्क बनियन वर एन्ट्री केल्यामुळे यवतमाळ जिल्ह्याच्या येथील तहसील कार्यालयावर एकच खळबळ उडाली.
दरम्यान शिक्षकांच्या प्रश्नासाठी आपण ही निवडणूक लढवीत असून विनाअनुदानित शिक्षकांच्या िक्षकांचे प्रश्न यानिमित्ताने मांडण्याचा आपण प्रयत्न करीत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
उल्हास पाटील हे अमरावती शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीतील उमेदवार आहेत . दरम्यान मतदान कसे होत आहे ? हे पाहण्यासाठी ते फुल पॅन्ट आणि बनियन घालूनच मतदान केंद्रावर पोहोचले तेव्हा प्रशासनाला काय करावे हे कळेना . त्यांना बघण्यासाठी मोठी गर्दी झाली होती . दरम्यान शासनाचा निषेध करण्यासाठी आपण हा प्रकार केला असल्याचे उल्हास पाटील म्हणाले . कारली येथील अभिनंदन विद्यालयात कार्यरत असताना गेल्या सतरा वर्षांपासून पगार मिळाला नाही . यानिमित्ताने विनाअनुदानित शिक्षकांचे प्रश्न शासन – प्रशासनाकडे मांडले परंतु आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही, म्हणून आपण ही निवडणूक लढवत असून शासनाचा निषेध करीत आहोत असेही ते म्हणाले.