CoronaMaharashtraUpdate : राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट , ६२९० रुग्णांना डिस्चार्ज

गेल्या २४ तासात राज्यात ४ हजार ९३० करोनाबाधित रुग्ण सापडले असून ६ हजार २९० रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर, ९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. दरम्यान दिवाळीत बाजारात झालेली गर्दी, नातेवाईकांच्या भेटीगाठी यामुळे पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात होती. दिवाळीनंतर रोज रुग्णही वाढू लागले होते त्यामुळं चिंता वाढली होती. मात्र, गेल्या दोन- तीन दिवसांपासून हा आकडा पुन्हा खाली उतरला आहे. राज्यात सध्या ८९ हजार ०९८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, राज्यातील रुग्ण बरे होण्याचा टक्का ९२. ४९ टक्के इतका झाला आहे.
राज्यात एकूण करोना बाधितांची संख्या १८,२८,८२६ इतकी झाली असून करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या १६ लाख ९१ हजार ४१२ इतकी झाली आहे. करोना मृतांचा आकडा दिलासा देणारा ठरला आहे. आज राज्यात ९५ करोना बाधितांचा मृत्यू झाला असून एकूण करोना मृतांचा आकडा ४७ हजार २४६ इतका झाला आहे. तर, राज्यातील मृत्यूदर २.५८ % एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ९ लाख १५ हजार ६८३ नमुन्यांपैकी १८ लाख २८ हजार ८२६ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ३८ हजार ८४ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ६ हजार २४० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. आज घडीला राज्यात ८९ हजार ९८ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. आज राज्यात ४ हजार ९३० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या आता १८ लाख २८ हजार ८२६ झाली आहे. आज नोंद झालेल्या ९५ मृत्यूंपैकी ३२ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर २० मृत्यू हे मागील आठवड्यातले आहेत. उर्वरित ४३ मृत्यू हे एक आठवड्यापूर्वीच्या कालावधीतले आहेत अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
दरम्यान नव्या वर्षापर्यंत कोरोना लस उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून प्रारंभी भारतात ३० कोटी लोकांचं लसीकरण होणार आहे. जुलै २०१९ पर्यंत ५० कोटी डोस बनवण्याची आणि २५ कोटी लोकांचं लसीकरण करण्याची योजना आहे. भारतात निवडणुकीत जसे मतदान केंद्रं असतात तशी कोरोना लशीकरणासाठी केंद्र तयार करण्याचा विचार सरकारचा आहे. विभागनिहाय तयारी केली जाईल. सरकारी किंवा खासगी डॉक्टरांना या मोहीमेची विशेष जबाबदारी सोपवली जाईल. मतदान केंद्रांप्रमाणे टीमही तयार केल्या जातील. लोकांनाही यात सामावून घेतलं जाईल, त्यांना आवश्यक प्रशिक्षण दिलं जाईल.
सीएनबीसी आवाजाला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत लशीची नेमकी किंमत ठरली नाही. मात्र एका डोसची किंमत २१० रुपये असेल त्यामुळे दोन डोससाठी ४२० रुपये खर्च येण्याची शक्यता आहे. मोठ्या संख्येनं लशीकरण करण्यासाठी ५० हजार कोटी रुपये खर्च येईल. मिळालेल्या माहितीनुसार सुरुवातीला कोरोना लशीवर सरकारचे 18 हजार कोटी रुपये खर्च होऊ शकतात.
Maharashtra reports 4,930 new #COVID19 cases, 6,290 recoveries/discharges, & 95 deaths in the last 24 hours, as per State Health Department
Total cases: 18,28,826
Total recoveries: 16,91,412
Active cases: 89,098
Death toll: 47,246 pic.twitter.com/N6TIFQT0yV
— ANI (@ANI) December 1, 2020