Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : व्हाॅट्सअॅपवर बहीण शोधली, भावजी ला घातला २५ लाखाला गंडा

Spread the love

औरंगाबाद – पुण्याच्या भामट्याने व्हाॅट्सअॅपर बहीण शोधून तिच्या नवर्‍याला तब्बल २५ लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी जवाहरनग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. योगेश गजानन कर्‍हाळे (३४) रा. शिवशंकर काॅलनी असे फसवणूक झालेल्या नागरिकाचे नाव अाहे.तर प्रशांत अचलारे उर्फ प्रविण शिंदे असे भामट्याचे नाव आहे.

या विषयी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि , प्रविण शिंदे ची व्हाॅट्सअॅपवरील एका अध्यात्मिक ग्रुपवरुन योगेश कर्‍हाळे यांच्या पत्नीशी ओळख झाली. आरोपी शिंदेने कर्‍हाळे यांच्या पत्नीला ताई ताई म्हणंत योगेश कर्‍हाळे यांच्याशी गंडवण्याइतकी जवळीक साधली दाजी दाजी म्हणू लागला. २०१९ मधे झेड पी च्या शिक्षक भरतीच्या जागा निघाल्यावर कर्‍हाळेंनी महापोर्टलवर नोकरीसाठी अर्ज केला. हा प्रकार ताई ने कथित भावाला सांगितला. कथितभाऊ आरोपी शिंदे ने दाजी तुम्ही काही काळजी करु नका तुमचे नौकरीचे काम शंभर टक्के होईल माझ्या लई वळखी आहेत असे म्हणंत ५०लाख रु. ची मागणी केली.१३लाख रु.नेट बॅकींग ने घेतले व शहरात तीन वेळेस येऊन साक्षीदारांसमक्ष जुलै, सप्टेंबर आणि डिसेंबर महिन्यात ५- ५-५ लाख घेतले.अशी तक्रार कर्‍हाळेंनी पोलिसांना दिली. त्यानंतर ५मे २०२० रोजी मुख्यमंत्र्यांनी सर्व परिक्षा रद्द करण्याचे आदेश जारी केले. तेंव्हा कर्‍हाळेंनी आरोपी शिंदे ला दिलेले ३०लाख रु.परंत मागितले. त्यापैकी शिंदे ने ४लाख २७ हजार रु. कसेबसे परंत केले व उर्वरित रक्कम देण्याची टाळाटाळ करु लागला.

आपली फसवणूक झाल्याचा हा प्रकार लक्षात आल्यावर कर्‍हाळेंनी जवाहरनगर पोलिस ठाण्यात तक्रार देताच गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यावर खाजगी नौकरी करणार्‍या नागरिकाकडे एवढी रक्कम कशी असा प्रश्न पोलिस तपासात उघंड झाला.यासाठी फिर्यांदींकडे पोलिसांनी विचारणा केली असता कर्‍हाळेंची पत्नी पोलिसांवरंच भडकली आमच्याच चौकशा का करता असे विचारु लागली. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय भासत पाचोळे करंत आहेत

आपलं सरकार

Click to listen highlighted text!