Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : कोरोना विषाणूरूपी रावणाचा नाश करूया , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विजया दशमीच्या शुभेच्छा

Spread the love

” विजयादशमी म्हणजे संकटावर, वाईट प्रवृत्तीवर विजय मिळवण्याची प्रेरणा. यंदाच्या विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या उत्सवातून सीमोल्लंघन करुन विजय खेचून विजय खेचून आणण्याची प्रेरणा घेऊ. आपण एकजुटीने करोनारुपी रावणाचा नाश करुया…” करोना संकटावर मात करुन महाराष्ट्र नव्या जोमाने भरभराट आणि समृद्धीकडे वाटचाल करेल असाही विश्वास व्यक्त करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

लढवय्या महाराष्ट्र ही आपल्या राज्याची ओळख आहे. आपण अनेकदा संकटांचा यशस्वीपणे सामना केला आहे. त्यामुळे करोना विषाणू विरोधातल्या लढ्यातही आपण सर्व भेद बाजूला ठेवून एकवटलो आहोत. करोनाच्या संकटात निसर्गाचीही अवकृपा झाली. पण या सगळ्या संकटांना न डगमगता आपण सामोरे जात आहोत. करोना विषाणूला पराजित करण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबवत आहोत. घराघरापर्यंत पोहचून करोना विषाणूचा पाठलाग करुन त्याला रोखण्यासाठी करोना योद्धे काम करत आहेत असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सगळ्यांनी खूपच संयम दाखवला आहे. सर्व धर्मीयांनी आपले सण आणि उत्सव घरीच साजरे केले. विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण आपण साजरा करणार आहोत. दसरा हा सण संकटांवर, वाईट प्रवृत्तींवर मात करण्यासाठी सीम्मोलंघन करुन विजय खेचून आणण्याची प्रेरणा देतो असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आपण दसरा उत्साहात साजरा करत असतानाच करोना विषाणूच्या समूळ उच्चाटनासाठी आरोग्य दक्षतेचे, गर्दी न करण्याचे, शारिरीक अंतर राखण्याचे, मास्क वापरण्याचे, वारंवार हात धुण्याच्या सूचनेचे पालन करावे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!