Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : दिलासादायक : राज्यात कोरोनमुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ कायम

Advertisements
Advertisements
Spread the love

राज्यात सोमवारी दिवसभरात आढळलेल्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या दुप्पट आहे. तर, १६५ रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. राज्यात आज ७ हजार ८९ नवे करोनाबाधित आढळले असून, १५ हजार ६५६ जणांनी करोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ८३.४९ टक्क्यांवर पोहचला आहे. राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता १५ लाख ३५ हजार ३१५ वर पोहचली आहे. यामध्ये २ लाख १२ हजार ४३९ अॅक्टिव केसेस, करोनामुक्त झालेले १२ लाख ८१ हजार ८९६ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ४० हजार ५१४ जणांच्या संख्येचा समावेश आहे. सध्या  २३ लाख २३ हजार ७९१ जण गृहविलगीकरणात आहेत. तर, २५ हजार ९५१ संस्थात्मक विलगीकरणात आहेत. आजपर्यंत तपासल्या गेलेल्या ७६ लाख ९७ हजार ९०६ नमून्यांपैकी १५ लाख ३५ हजार ३१५ नमूने(१९.९४ टक्के) करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहेत.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!