Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : धनगर समाजाची कोल्हापुरात आरक्षणासाठी गोलमेज परिषद , खा . संभाजी महाराज यांचाही पाठिंबा

Spread the love

मराठा समाजाने आपले आरक्षण टिकविण्यासाठी केलेले आंदोलन लक्षात घेता धनगर समाजानेही आपल्या मागण्यासाठी आंदोलनाला सुरुवात केली आहे . त्याचंच एक भाग म्हणून आज आज कोल्हापुरात गोलमेज परिषद घेण्यात आली. समाजाच्या हितापेक्षा स्वार्थासाठी धनगर समाजातील नेते वेगवेगळी आंदोलने करत असल्याने मूळ प्रश्नाचा आवाज सरकारपर्यंत पोहोचण्यात अडथळे येत आहेत. यामुळे यापुढे धनगर समाजातील सर्व संघटना एका झेंड्याखाली येऊन आरक्षणाच्या मागणीची हक्काची लढाई लढतील असा महत्त्वपूर्ण ठराव या  परिषदेत करण्यात आला.  ज्येष्ठ नेते आण्णासाहेब डांगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेत समाजातील अनेक संघटना सहभागी झाल्या होत्या.

या परिषदेच्या निमित्ताने बोलताना डांगे म्हणाले कि , आरक्षणाच्या लढाईसाठी मराठा समाज एकत्र आला आहे. पण धनगर समाज अजूनही एकत्र येत नसल्याचे दिसते. ही लढाई एकाने नव्हे तर एकीने लढण्याची वेळ आली आहे. यामुळे समाजातील नेत्यांनी स्वार्थ बाजूला ठेवून एका झेंड्याखाली एकत्र येण्याची गरज आहे. दरम्यान धनगर समाजाने सुरू केलेल्या आरक्षणाच्या लढाईत मराठा समाजाचा पूर्ण पाठिंबा राहिल अशी ग्वाही खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी धनगर समाजाचे नेते हे माजी मंत्री राम शिंदे यांना दिली.

धनगर समाजाची गोलमेज परिषद झाल्यानंतर शिंदे यांनी सायंकाळी खासदार संभाजीराजे यांची भेट घेऊन धनगर आरक्षणाच्या लढाईला सहकार्य करण्याची विनंती केली होती. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढाईत धनगर समाजाने पाठिंबा द्यावा, मराठा समाज धनगर आरक्षणाच्या लढाईत ताकतीने उतरेल अशी ग्वाही संभाजीराजे यांनी दिली. दोन्ही समाजांनी मिळून आपापल्या आरक्षणाच्या लढाईसाठी लढा देण्याचा निर्धारही या वेळी व्यक्त करण्यात आला. दरम्यान, सकाळी आमदार गोपीचंद पडळकर यांनीही खासदार संभाजीराजे यांच्याकडे धनगर समाजाला पाठिंबा देण्याची मागणी केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!