Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : हाथरस प्रकरणात योगी सरकारची बघ्याची भूमिका , शरद पवार यांनी केला तीव्र निषेध

Spread the love

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख खा . शरद पवार यांनी  उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणावर आपली  तीव्र प्रतिक्रिया दिली आहे .  हाथरस  येथे एका दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिला बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर पीडितेचा मृत्यू झाला आणि पोलिसानी मृतदेहावर परस्पर अंत्यसंस्कार केले. असा प्रकार देशात आधी कधीच घडला नाही’, असे नमूद करत पवार यांनी आपला निषेध नोंदवला.

या प्रकरणावर आपली सविस्तर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले कि , हाथरस येथे पीडित तरुणीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असताना राहुल गांधी यांना रोखण्यात आलं. त्यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली व जमिनीवर खाली पाडलं. नंतर त्यांना अटकही करण्यात आली. या संपूर्ण प्रकारावर पवारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. उत्तर प्रदेश पोलिसांनी पीडित तरुणीचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांना का दिला नाही? आता पीडित तरुणीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असलेल्या नेत्यांना का अडवले जात आहे? याचाच अर्थ उत्तर प्रदेशात कायद्याला कवडीचीही किंमत राहिली नाही, हे स्पष्ट होत आहे, असे पवार म्हणाले. महाराष्ट्रात अशी एखादी घटना घडल्यास त्यावर तात्काळ अॅक्शन घेतली जाते मात्र उत्तर प्रदेशात लागोपाठ दोन घटनांमध्ये तसे काही दिसले नाही. ठोस अशी काहीच कारवाई होत नसल्याने तेथील राज्य सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याचा संदेश सर्वत्र गेला आहे, असेही पवार यांनी पुढे सांगितले.

हाथरस येथील घटना आणि त्यानंतर जे काही घडत आहे तो सगळाच प्रकार दुर्दैवी आहे. उत्तर प्रदेशच्या पोलिसांनीच कायदा हातात घेतला आणि पीडित तरुणीच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली. असे या आधी देशात कधीच कुठे घडले नाही. उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या कृत्यावर देशभरात संताप उमटला. ही जनतेची रिअॅक्शन योग्यच आहे, असे परखड मत पवार यांनी व्यक्त केले. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे शांततेच्या मार्गाने हाथरसला निघाले होते. पीडितेच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी ते जात होते. त्यांना जायला देण्यात काहीच हरकत असण्याचे कारण नव्हते. मात्र त्यांना रोखले गेले. त्यांच्यासोबत जे काही घडले ते योग्य नाही, अशा शब्दांत पवार यांनी पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप नोंदवला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!