Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : गेल्या २४ तासात आढळले २३,८१६ रुग्ण , तर ३२५ रुग्णांचा मृत्यू , १३,९०६ रुग्णंना डिस्चार्ज

Spread the love

गेल्या २४ तासात राज्यात २३ हजार ८१६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत  तर १३,९०६ रुग्णंना डिस्चार्ज देण्यात आला.  राज्यात काल  मंगळवारी २० हजार १३१ नवीन करोना बाधितांची नोंद झाली होती. दरम्यान राज्यातील एकूण रुग्णसंख्या १० लाखांच्या आणखी जवळ पोहचली आहे. राज्यात आतापर्यंत करोनाच्या ४८ लाख ८३ हजार ६ चाचण्या घेण्यात आल्या असून त्यातील १९.८१ टक्के म्हणजेच ९ लाख ६७ हजार ३४१ चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, ३२५ रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण करोनाबाधितांचा आकडा ९,६७,३४९वर पोहोचला असून यांपैकी ६,८६,४२६ रुग्ण बरे झाले आहेत. तर अद्याप राज्यात २,५२,७३४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्याच्या आरोग्या विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

राज्यातील रुग्णांचा बरे होण्याचे प्रमाण ७०.९६ असून तर करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण २.८७ एवढे आहे. तर ४८,८३,००६ नमुन्यांपैकी आज ९,६७,३४९ रुग्ण करोनाबाधित आढळून आले. आजचा संसर्गबाधितांचे प्रमाण हे १९.८१ टक्के आहे. राज्यात सध्या १६,११,२८० लोक होम क्वारंटाइन असून ३७,६४४ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

पुण्यात दिवसभरात ४१ रुग्णांचा मृत्यू

दरम्यान, राज्यात सध्या पुणे जिल्ह्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. पुण्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची आजची संख्या ६५ हजार ३६१ इतकी आहे. पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने २०७८ रुग्ण आढळल्याने, १ लाख ११ हजार ९१६ एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर दिवसभरात ४१ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आज अखेर २ हजार ६२५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या २०१३ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर ९२ हजार ६१४ रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी दिवसभरात १ हजार २५९ जण करोनाबाधित आढळले असून १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५०२ जण आज करोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ५८ हजार ७४७ वर पोहचली असून यांपैकी, ४५ हजार २१२ जण करोनातून बरे झाले आहेत. महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ६ हजार ८१ एवढी आहे, अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

ठाणे जिल्ह्यात ५७६ तर मुंबई पालिका हद्दीत २५ हजार ६६५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.  दरम्यान  ठाणे जिल्ह्यातील करोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढू लागला आहे. बुधवारी जिल्ह्यात तब्बल १ हजार ९६४ नवीन करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून यापैकी ठाणे शहरात ४५५, कल्याण-डोंबिवली ५३६, नवी मुंबईमध्ये ३५५ रुग्ण वाढले आहेत. पुन्हा एकदा या शहरामध्ये एका दिवसात मोठ्या संख्येने रुग्ण वाढल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. बुधवारी जिल्ह्यात वाढलेल्या रुग्णांच्या संख्येनंतर जिल्ह्यातील बाधितांचा आकडा १ लाख ३८ हजार ३९३ इतका झाला आहे. आतापर्यंत १ लाख १८ हजार ५५३ रुग्ण बरे झाले असून सध्या १६ हजार ३० रुग्ण उपचार घेत आहेत. दिवसभरात ३६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे मृतांचा आकडा ३८१० वर गेला आहे. ठाणे शहरात बुधवारी ४५५ नवीन करोना बाधितांची नोंद झाली असून एकूण बाधितांची संख्या २८ हजार ६८१ वर पोहचली आहे. कल्याण-डोंबिवली शहरात ५३६ नव्या करोना रुग्णाची नोंद झाल्याने करोना रुग्णाची संख्या ३२ हजार ८२५ इतकी झाली आहे. नवी मुंबईतही रुग्ण वाढले असून ३५५ नवीन रुग्णांची भर पडल्यानंतर बाधितांचा आकडा २९ हजार १६५ इतका झाला आहे. वसई विरारमध्ये नवीन २५२ करोना बाधितांची नोंद झाली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!