Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : विदेशात जायचंय ? मग आता शासनाच्या परवानगीची गरज नाही ,हे वाचा आणि बिनधास्त जा ….

Spread the love

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारतातून शिक्षण, काम किंवा पर्यटनाच्या उद्देशानं परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा देण्यात आला आहे.  नागरी उड्डाण मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार परदेश प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना परवानगीसाठी  आता नागरी विमान मंत्रालयाकडेअर्ज करण्याची गरज नाही ते थेट विमान कंपन्यांकडून आपली तिकीट बुक करू शकतात, या अगोदर २२ ऑगस्ट रोजी गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या प्रोटोकॉलनुसार, नागरी उड्डाण मंत्रालय किंवा मंत्रालयाद्वारे नामांकित एजन्सीमध्ये नागरिकांना आवश्यक माहितीसहीत अर्ज करावा लागेल. यात प्रस्थान आणि आगमन स्थळाच्या माहितीचाही समावेश होता. परंतु, ‘वंदे भारत मिशन’  तसंच ‘एअर ट्राफिक बबल सिस्टम’द्वारे संचालित सर्व विमान कंपन्यांना या उद्देशानं नामांकित करण्यात आले असल्याचे नागरी उड्डाण मंत्रालयाने आता स्पष्ट केलं आहे . त्यामुळे द्विपक्षीय ‘एअर बबल व्यवस्थे’द्वारे दोन्ही देशांची विमानं काही नियमांसहीत विशेष आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणांना संचालित करू शकतात.

या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून आपल्या प्रवासासाठी थेट एअरलाईन्सशी तिकीट बुक करण्यासाठी संपर्क करावा लागेल. त्यांना नागरी उड्डाण मंत्रालयाकडे अर्ज करण्याची आवश्यकता नाही, असंही स्पष्ट करण्यात आलंय. देशात करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या २३ मार्चपासून निर्धारीत आंतरराष्ट्रीय उड्डाणं थांबवण्यात आली होती. या दरम्यान ‘वंदे भारत मिशन’ आणि द्विपक्षीय ‘एअर बबल व्यवस्थे’द्वारे  विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरू आहेत. भारतानं याच वर्षी जुलैपासून आत्तापर्यंत अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, संयुक्त अरब आमिरात तसंच कतार यांसारख्या देशांसोबत वेगवेगळ्या द्विपक्षीय एअर बबल व्यवस्थेवर करार केले आहेत. त्यामुळे तुम्ही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ई -पास विना देशात मुक्तपणे फिरू शकत नसला तरी विदेशात मात्र आता केंद्र शासनाची परवानगी न घेता विदेशात बिधास्त उडू शकता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!