Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : आरबीआयच्या अहवालावरून राहुल गांधी यांची पुन्हा मोदी सरकारवर टीका

Spread the love

भारतातील शिखर बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या एका अहवालावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी मोदी सरकारवर पुन्हा एकदा हल्ला केला आहे. आरबीआयच्या प्रकाशित झालेल्या अहवालानंतर ‘मीडियाच्या माध्यमातून दिशाभूल केल्याने गरीबांना मदत मिळणार नाही’ असं म्हणत राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधलाय. करोना काळात अर्थव्यवस्थेवर पडलेल्या ताणानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून इशारा देण्यात असून या अहवालाबद्दलची एक बातमी राहुल गांधी यांनी बुधवारी सोशल मीडियावर शेअर करताना मोदी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे

आपल्या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी म्हटले आहे कि, ‘मी गेल्या कित्येक महिन्यांपासून देत असलेल्या इशाऱ्यांना आरबीआयने  आता दुजोरा दिला आहे’  सरकारनं अधिक खर्च करावा, अधिक उधार देऊ नये. गरीबांना पैसे द्यावेत, उद्योपतींना करात कपात नाही… अर्थव्यवस्थेला उपभोगासोबत पुन्हा: रुळावर आणावं’ असा सल्लाही राहुल गांधी यांनी मोदी सरकारला दिला आहे. ‘मीडियाच्या माध्यमातून लक्ष दुसरीकडे वळवण्यानं गरीबांना मदत मिळणार नाही किंवा आर्थिक संकट आपोआप गायबही होणार नाही.

दरम्यान सत्ताधारी पक्षाने  मात्र विरोधकांचे सगळेच दावे फेटाळून लावलेत. गेल्याच आठवड्यात भाजप प्रमुख जे पी नड्डा यांनी राहुल गांधी यांना ‘अपात्र राजकुमार’ तसंच ‘पराभूत व्यक्ती’ म्हणत त्यांच्यावर टीका केली होती. राहुल गांधी पीएम केअर बद्दल चुकीच्या बातम्या फैलावत असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. उल्लेखनीय म्हणजे, मंगळवारी आरबीआयकडून सप्टेंबर महिन्यापर्यंत आर्थिक आकुंचनाचा इशारा देण्यात आला होता. ‘करोना व्हायरसचा अधिक फैलाव, कोणत्याही पूर्वानुमानाशिवाय अचानक जोरदार पाऊस आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय बाजारात चढ-उतार हे विकासाचे मुख्य धोके आहेत’ असे  या अहवालात आरबीआयने म्हटले आहे .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!