Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaUpdate : गेल्या २४ तासात भारतात आढळले उच्चांकी 75760 नवे रुग्ण आणि 1023 जणांचा झाला मृत्यू

Spread the love

जगभरात आत्तापर्यंत २.४१ कोटींहून अधिक जण करोना संक्रमणाच्या विळख्यात अडकलेले दिसत आहेत. तर ८.२५ लाखांहून अधिक रुग्णांना  कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे . दरम्यान गेल्या २४ तासांत भारतात कोविडचे नवीन ७५ हजार ७६० नवीन रुग्ण आढळून आले आहेत . यामुळे देशातील एकूण रुग्णांची संख्या ३३ लाख १० हजार २३४ वर पोहचली आहे. देशात अद्याप ७ लाख २५ हजार ९९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. २४ तासांत देशात १०२३ मृत्युची नोंद करण्यात आली. त्यामुळे एकूण मृत्युंची संख्या ६० हजार ४७२ वर पोहचली असून  आत्तापर्यंत या आजारावर मात करणाऱ्यांची एकूण संख्या २५ लाख २३ हजार ७७१ वर पोहचली आहे. आत्तापर्यंत देशात एकूण ३ कोटी ८५ लाख ७६ हजार ५१० सॅम्पलची चाचणी करण्यात आलीय. यातील २६ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी ९ लाख २४ हजार ९९८ करोना सॅम्पल्सची चाचणी घेण्यात आली.

दरम्यान महाराष्ट्रात गेल्या ११ दिवसांत देशात करोनामुळे १० हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. १५ ऑगस्ट दरम्यान मृतांचा आकडा ५० हजारांच्या जवळपास पोहचला होता. तर मृत्युदरात घट होऊन तो १.९ टक्क्यांवर पोहचला होता. परंतु, बुधवारी मृत्युदरात वाढ नोंदवण्यात आली. सध्या मृत्युदर १.८ टक्क्यांवर पोहचला आहे . दरम्यान देशात अनेक राज्यांत करोना रुग्णांच्या संख्येनं अचानक जोर धरलेला दिसून येतोय. महाराष्ट्रात बुधवारी सर्वाधिक म्हणजेच १४ हजार ८८८ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. तर कर्नाटकात बुधवारी १३३ रुग्णांचा मृत्यू झाला. याशिवाय उत्तर प्रदेश, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ, ओडिशा, हरियाणा आणि उत्तराखंड यांसारख्या राज्यातही करोना संक्रमणाच्या आकडेवारीत वाढ दिसून येते आहे .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!