Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : औरंगाबाद शहर कोविडच्या सामाजिक संक्रमणच्या विळख्यात , सेरो सर्वेक्षणात आढळून आल्या १ लाख ७० हजार अँटीबॉडीज

Spread the love

औरंगाबाद शहरात करण्यात आलेल्या सेरो सर्वेक्षणानुसार काही भागांमध्ये बऱ्याच लोकांमध्ये विरोधी प्रतिद्रव्य आढळून आली असली तरी सर्व शहरवासीयांनी गाफील राहून चालणार नाही कारण या तपासणीतून केवळ विरोधी प्रतिद्रव्य आढळून येतात असे नाही येतात किंवा नाही हे तपासले जाते होऊ नये यासाठी किती प्रमाणात प्रतिद्रव्य लागतात हे अजूनही ज्ञात नाही आणि ही प्रतिद्रव्य किती दिवस रक्तात राहतात याविषयी सुद्धा माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे अशा सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज औरंगाबादकरांना एका पत्रकार परिषदेत देण्यात आल्या.

या सर्वेक्षणाचा विषयी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की , हे सर्वेक्षण संपूर्ण शहराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकसंख्येत केलेले असल्याने , असे म्हणता येते की कोविड  रोगाचे सामाजिक संक्रमण होत आहे आणि त्यामुळे यापुढे सार्वजनिक आरोग्य उपाययोजना म्हणून लॉकडाऊन सारख्या उपायांचा फारसा उपयोग होणार नाही , मात्र मास्क  वापरणे,  वारंवार साबण-पाण्याने हात स्वच्छ धुणे आणि सुरक्षित अंतर राखणे या उपायांची कडक  अंमलबजावणी आवश्यक आहे. औरंगाबाद शहरात दिनांक १० ते १६ ऑगस्ट दरम्यान कोविड सर्वेक्षण करण्यात आले, यात अनेक संस्थांनी मोलाचे योगदान दिल्याचे ही जिल्हाधिकारी म्हणाले.

औरंगाबादचे माजी जिल्हाधिकारी उदय चौधरी, औरंगाबाद महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अस्तिक कुमार पांडे,  घाटीच्या अधिष्ठाता डॉ. काननबाला येळीकर,  महात्मा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे उप अधिष्ठाता डॉ. प्रवीण सूर्यवंशी तसेच भारतीय जैन संघटना यांच्या सहाय्याने हा उपक्रम पार पाडण्यात आला.  सेरो सर्वेक्षणाच्या शास्त्रीय अभ्यासाची जबाबदारी मुख्य संशोधक  डॉ.  जगन्नाथ दीक्षित यांच्या बरोबर सहाय्य्क संशोधक डॉ. ज्योती बजाज,  डॉ. स्मिता अंदुरकर,  डॉ. मोहम्मद घोडके,  डॉ.  श्रुती गायकवाड,  औरंगाबाद महापालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर,  जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. मुजीब सय्यद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ,  एमजीएमच्या डॉ. शोभा साळवे आदींनी पार पाडली.

शहरात केलेल्या कोविड सिरो सर्वेक्षणात शहरातील ११.८१ टक्के म्हणजे १ लाख ७० हजार नागरिकांमध्ये कोविड विरोधी प्रतिद्रव्ये (अँटीबॉडीज) आढळून आल्या असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी चव्हाण म्हणले कि , हा अहवाल शहराच्या लोकसंख्येचे प्रतिनिधीत्व करत असल्यामुळे लोकसंख्येनुसार कोविड विरोधी प्रतिद्रव्ये आढळून आलेल्यांची संख्या १ लाख ७० हजार असू शकते हा केवळ अंदाज आहे . औरंगाबाद शहरामध्ये १० ते १६ ऑगस्ट दरम्यान करण्यात आलेल्या सिरो सर्वेक्षणात शहरातील सर्व ११५ वार्डांमधील लोकसंख्येच्या प्रमाणानुसार एकूण ४ हजार ३२७ नमुने तपासण्यात आले. यामध्ये १० ते १७ वर्षे वयोगटातील मुलांचाही ३० क्लस्टर पद्धतीने अभ्यास करण्यात आला. ११.८१ टक्क्यांमध्ये झोपडपट्टीतील लोकसंख्येत हे प्रमाण १४.५६ टक्के तर इतर लोकसंख्येत १०.६४ टक्के आहे.

यावेळी घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. काननबाला  येळीकर म्हणाल्या की, आपल्याला आणखी बरीच लढाई लढायची आहे, शहरी भागात करोना रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी होत असली तरी ग्रामीण भागामध्ये रुग्णसंख्या वाढत आहे त्यानुसार आपल्याला नियोजन करावे लागणार आहे. दरम्यान  सिरो सर्वेक्षणाच्या अहवालानुसार आता लॉकडाऊनचा फारसा उपयोग राहणार नसल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले. शहरातील सिल्लेखाना- नुतन कॉलनी, म्हाडा कॉलनी, जूना बाजार, न्यायनगर, निझामगंज- संजयनगर या पाच वॉर्डामधील लोकांमध्ये सर्वाधिक प्रतिद्रव्ये आढळून आले असून जय विश्वभारती कॉलनी, विश्वासनगर, जवाहर कॉलनी – शास्त्रीनगर, संत ज्ञानेश्वरनगर या पाच वार्डांमध्ये सर्वात कमी म्हणजे शून्य टक्के लोकांमध्ये कोविड विरोधी प्रतिद्रव्ये आढळून आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!