Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCoronaUpdate : चिंताजनक : तीन वर्षीय बालकासह औरंगाबादेत ८ कोरोनाबाधितांचा मृत्यू

Spread the love

राज्यात करोना साथीचा संसर्ग वाढत असताना आता ग्रामीण भागांतही करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज येथील तीन वर्षीय चिमुकल्यासह चौघांचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील करोना बळींची संख्या ५९३ झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात करोनाने आतापर्यंत दोन बालरुग्णांचा बळी घेतल्यानं खळबळ माजली आहे.

आज दिवसभरात सहा  तर सकाळी दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला यामध्ये घाटीत वाळूजच्या समता नगरातील 03 वर्षीय मुलगा, एन तेरा हडकोतील 49, दीप नगर, एन अकरातील 46, जटवाडा, हर्सुल येथील 70, कन्नड तालुक्यातील घाटशेंद्रातील 71 वर्षीय पुरूष आणि फुलंब्रीच्या महारसावलीतील 70 वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर सकाळी दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला यामध्ये एका खासगी रुग्णालयात रांजणगाव, वाळूज येथील 27, त्रिमूर्ती चौक, बजाज नगरातील 85 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

वाळूज येथील समता कॉलनी येथील तीन वर्षीय बालरुग्णाला १४ ऑगस्ट रोजी घाटीत दाखल केले होते व त्याचदिवशी रुग्ण बाधित असल्याचे निदान झाले होते. उपचारादरम्यान करोना विषाणुच्या गंभीर संसर्गासह मेंदुज्वर, रिकेटशियल फिव्हर आदी आजारांमुळे बालरुग्णाचा रविवारी (१६ ऑगस्ट) दुपारी १२ वाजता मृत्यू झाला. याशिवाय हडको एन-१३ परिसरातील ४९ वर्षीय पुरुष रुग्णाला ११ ऑगस्ट रोजी घाटीत दाखल केले होते व त्याचदिवशी रुग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले असतानाच रुग्णाचा रविवारी दुपारी सव्वा वाजता मृत्यू झाला. महारसावली (ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) येथील ७० वर्षीय महिला रुग्णाला ११ ऑगस्ट रोजी घाटीत दाखल केले होते व त्याचदिवशी रुग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. उपचार सुरू असताना रुग्णाचा रविवारी रात्री सव्वाआठ वाजता मृत्यू झाला. घाटशेंद्रा (ता. कन्नड, जि. औरंगाबाद) येथील ७१ वर्षीय पुरुष रुग्णाला रविवारी मध्यरात्री घाटीत दाखल केले होते व रुग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले असतानाच रुग्णाचा सोमवारी पहाटे पाच वाजता मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत ४४२, तर जिल्ह्यातील ५९३ बाधितांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!