Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaUpdate : देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण

Spread the love

देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कोरोनाची चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून त्यांना  दिल्लीच्या आर्मी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.आहे. प्रणव मुखर्जी यांनी स्वत: याबद्दल ट्वीट करून माहिती दिली आहे. प्रणव मुखर्जी हे रुग्णालयात गेले होते. तेव्हा त्यांनी आपली कोरोनाची चाचणी केली. यात त्यांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत प्रणव मुखर्जी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे कि, ‘मी एका कामासाठी रुग्णालयात गेलो होतो. त्यावेळी मला कोरोनाची लागण झाली असल्याचे समजले. त्यामुळे मागील आठवड्याभरात माझ्या संपर्कात असलेल्या लोकांनी कृपया समोर येऊन माहिती द्यावी आणि स्वत:  क्वारंटाइनमध्ये राहावे’.

दरम्यान, भारतात कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढत असून  1 ऑगस्ट ते 9 ऑगस्टपर्यंत मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचं समोर येत आहे. सलग चौथ्या दिवशीही 60 हजाराहून अधिक नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 22 लाख 15 हजार 075 वर पोहोचली आहे.  गेल्या 24 तासांत 1,007 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 6 लाख 15 हजार 945 रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. तर 15 लाख 35 हजार 744 रुग्णांवर यशस्वीपणे उपचार करण्यात आले आहेत. देशभरात आतापर्यंत कोरोनामुळे 44, 386 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.जगभरातील कोरोना आकडेवारीचा विचार करता अमेरिका आणि ब्राझिलनंतर भारताचा क्रमांक लागला आहे. भारतात सर्वाधिक कोरोनाची संख्या महाराष्ट्र, तमिळनाडू, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकात आहे. अर्थात भारतासाठी जमेची बाजू म्हणजे रुग्णाच्या उपचाराचा दर समाधानकारक असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना गेल्या आठवड्यात भाजपच्या पाच मोठ्या नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.  कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा, तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, भाजपचे यूपी प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव आणि उत्तर प्रदेशचे जलशक्ती मंत्री महेंद्र सिंह यांचा समावेश आहे. तर कोरोनामुळे उत्तर प्रदेशच्या मंत्री कमलराणी वरूण यांचा मृत्यूही झाला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!