Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaNewsUpdate : अमित शहा पाठोपाठ तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांचीही कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह

Spread the love

तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची कोरोनाची  चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना काही लक्षणे दिसू लागल्याने त्यांची चाचणी करण्यात आली होती. ती पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर आता उपचार सुरु करण्यात आले आहेत. राज्यपालांच्या संपर्कात जे लोक आले होते त्यांचीही कोरोना चाचणी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. याबाबत कावेरी हॉस्पिटलने मेडिकल बुलेटीनही जारीकेले आहे. पुरोहित यांना फारशी लक्षणे दिसत नाहीत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना घरीच क्वारंटाइन करण्यात  आलं असून त्यांच्यावर डॉक्टरांचं पथक लक्ष ठेवून असल्याचंही हॉस्पिटलने म्हटलं आहे. रविवारीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाले आहे.

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. त्यांनी ट्विट केल्यानुसार – त्यांना कोरोनाची प्राथमिक लक्षण दिसून येत होती. त्यांनी चाचणी केल्यानंतर चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यांनी पुढे लिहिले आहे की – त्यांची तब्येत ठीक आहे. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात भरती करण्यात येत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे. यानंतर अमित शहा यांच्या संपर्कात आलेल्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. याबाबत स्वत: अमित शहा यांनी ट्विट करुन विनंती केली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ला आयसोलेट करावे आणि चाचणी करुन घ्यावी असं आवाहन केलं आहे.

दरम्यान देशाचे गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्याने  केंद्रीय मंत्रिमंडळात धावपळ सुरू झाली आहे. अमित शहां यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळाचे अनेक मंत्री होम क्वारंटाईन होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृह मंत्रालयातील अनेक जेष्ठ अधिकारी देखील होम क्वारंटाईन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. यामध्ये अमित शहांसह अनेक मंत्री सहभागी झाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात अमित शहा यांना कोरोणाची लक्षणं आढळून आली आहेत. पाच दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. यामध्ये अमित शहा उपस्थित होते. यामुळे आता इतर मंत्र्यांना होम क्वारंटाईन करण्यात येणार असून त्यांची तातडीने चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यानंतर भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेकांनी ट्विट करुन अमित शहा यांची तब्येत लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!