Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaVirusIndiaUpdate : गेल्या २४ तासात देशभरात आढळले ३७ हजार नवे रुग्ण , ५८७ जणांचा मृत्यू

Spread the love

देशातील एकूण रुग्णांची संख्या आता 11 लाख 55 हजारहून अधिक झाली आहे. दिवसागणिक 35-40 हजार नवीन रुग्ण सापडताना दिसत आहेत. गेल्या 24 तासांतही 37 हजार 140 नवीन रुग्ण सापडले. याआधी सोमवारी तब्बल 40 हजार नवीन रुग्ण सापडले होते, त्यामुळे रुग्णांची संख्या काही अंशी कमी झाल्याचे दिसत आहे. तर, 24 तासांत 587 रुग्णांचा मृत्यू झाला, यासह देशातील एकूण मृतांचा आकडा 28 हजार पार झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, सध्या देशात 4 लाख 2 हजार 529 सक्रीय रुग्ण आहेत. तर, 28 हजार 084 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे 7 लाख 24 हजार 577 रुग्ण निरोगीही झाले आहेत. देशातील एकूण रुग्णांपेक्षा 1.23 लाख रुग्ण एकट्या दिल्लीत आहे. दिल्ली सर्वात जास्त रुग्ण असलेल्या राज्यांमध्ये तिसऱ्या तर मृतांच्या आकडेवारीत दुसऱ्या स्थानावर आहेत. देशात सगळ्यात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 3.18 लाख आहे. कोरोनाचे सर्वात जास्त सक्रिय रुग्ण महाराष्ट्रात आहेत. दरम्यान सोमवारी राज्यात कोरोनाचे 8240 नवे रुग्ण सापडले. तर, 176 जणांचा मृत्यू झाला. यासह राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 3 लाख 18 हजार 695 झाली आहे. तर, 1 लाख 75 हजार 029 रुग्ण निरोगी झाले आहेत. मुंबईत एकाच दिवसात 1043 रुग्ण सापडले. मुंबईतील एकूण रुग्णंची संख्या 1 लाखांपेक्षा जास्त आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!